मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाच्या 'मजबूत' दिग्गज्जांनी लाज आणली, इतिहासातली सगळ्यात वाईट कामगिरी

IND vs ENG : टीम इंडियाच्या 'मजबूत' दिग्गज्जांनी लाज आणली, इतिहासातली सगळ्यात वाईट कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने (India vs England) लाजीरवाणी कामगिरी केली आहे. भारताचे टॉप-3 बॅट्समन केएल राहुल (KL Rahul), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) फक्त 5 रन करून माघारी परतले.

  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 12 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने (India vs England) लाजीरवाणी कामगिरी केली आहे. भारताचे टॉप-3 बॅट्समन फक्त 5 रन करून माघारी परतले. टी-20 इतिहासातली भारताची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. पाच मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या मॅचसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आल्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला उतरले. टीम इंडियाची ही 138वी टी-20 मॅच आहे.

पहिले बॅटिंगला उतरलेल्या भारतीय टीमची सुरूवात खराब झाली. केएल राहुलला एक रनवर जोफ्रा आर्चरने बोल्ड केलं, तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाच बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. लेग स्पिनर आदिल रशीदने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला. याआधी चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही त्याला खातं उघडता आलं नव्हतं. करियरमध्ये पहिल्यांदाच विराटवर ही नामुष्की ओढवली. तर दुसरीकडे कर्णधार म्हणून विराट 14 व्यांदा शून्यवर आऊट झाला. हे नकोसं रेकॉर्डही विराटच्या नावावर झालं. याआधी सौरव गांगुली कर्णधार असताना 13 वेळा शून्यवर आऊट झाला होता.

शिखर धवन यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. 4 रन करून तो आऊट झाला, त्यामुळे भारताच्या सुरूवातीच्या तीन बॅट्समनना फक्त 5 रन करता आले. याआधी ऑक्टोबर 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या टॉप-3 ला फक्त 10 रन करता आल्या होत्या. त्यावेळी रोहितने 8 रन तर धवनने 2 रन केले होते, विराट त्यावेळीही शून्य रनवर आऊट झाला होता.

भारताचे सुरूवातीचे बॅट्समन अपयशी ठरल्यामुळे त्यांना पहिल्या 6 ओव्हरमध्ये फक्त 22 रनच करता आले. तर 20 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 124-7 एवढा झाला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 48 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली, यामध्ये एक सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Shikhar dhawan, Sports, Virat kohli