Home /News /sport /

IND vs ENG : धवनचा 'कडक' शॉट, इंग्लंडचा खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर

IND vs ENG : धवनचा 'कडक' शॉट, इंग्लंडचा खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडच्या (India vs England) सॅम बिलिंग्सला (Sam Billings) फिल्डिंग करताना दुखापत झाली. शिखर धवनने (Shikhar Dhawan) मारलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करत असताना बिलिंग्स दुखापतग्रस्त झाला.

    पुणे, 23 मार्च : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडच्या (India vs England) सॅम बिलिंग्सला (Sam Billings) फिल्डिंग करताना दुखापत झाली. शिखर धवनने (Shikhar Dhawan) मारलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करत असताना बिलिंग्स दुखापतग्रस्त झाला. बिलिंग्सला कॉलर बोन म्हणजेच खांद्याच्या हाडाला दुखापत झाली आहे. 33 व्या ओव्हरमध्ये डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना बिलिंग्सला दुखापत झाली. खूप त्रास होत असल्यामुळे तो मैदान सोडून बाहेर गेला. त्याच्याऐवजी लियाम लिव्हिंगस्टोन फिल्डिंगसाठी मैदानात उतरला. 33व्या ओव्हरमध्ये मार्क वूडच्या शेवटच्या बॉलवर शिखर धवनने पूल शॉट मारला. हा शॉट डीप स्क्वेयर लेगच्या दिशेने गेला तेव्हा बॉल अडवण्याचा प्रयत्न करताना बिलिंग्स खांद्यावर पडला, त्याला उठताही येत नव्हतं. रिप्लेमध्ये बिलिंग्सचा पायही बाऊंड्री लाईनला लागल्याचं दिसलं, त्यामुळे शिखर धवनला 4 रन मिळाले. दुखापत झाल्यामुळे बिलिंग्जला फिजियोची मदत घ्यावी लागली. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि इतर खेळाडू बिलिंग्सला उठवायला गेले. यानंतर फिजियो आणि बाकी खेळाडूंनी मिळून त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. बिलिंग्सच्या खांद्याला सूज आल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 29 वर्षांचा सॅम बिलिंग्स 20 सप्टेंबर 2020 साली पहिल्यांदा इंग्लंडच्या वनडे टीममध्ये आला. आतापर्यंत 21 वनडेमध्ये बिलिंग्सने 36.62 च्या सरासरीने 586 रन केले. 118 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले भारताला बॅटिंगला बोलावलं. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 317 रन केले. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि आपली पहिलीच वनडे खेळणाऱ्या कृणाल पांड्या यांनी अर्धशतकं करत भारताचा स्कोअर 300 रनच्या पुढे पोहोचवला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या