Home /News /sport /

IND vs ENG : मुंबईकर रोहित पुण्यात फेल; वनडेमध्ये 3 डबल सेंच्युरी, पण...

IND vs ENG : मुंबईकर रोहित पुण्यात फेल; वनडेमध्ये 3 डबल सेंच्युरी, पण...

वनडे क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) गणना होते. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक तीन द्विशतकं आहेत, पण पुण्याच्या मैदानात रोहितची कामगिरी निराशाजनक आहे.

    पुणे, 23 मार्च : वनडे क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) गणना होते. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक तीन द्विशतकं आहेत, पण पुण्याच्या मैदानात रोहितची कामगिरी निराशाजनक आहे. पुण्यात 6 इनिंगमध्ये रोहितला फक्त 99 रन करता आल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्येही (India vs England) रोहित फक्त 28 रन करून आऊट झाला. भारत आणि इंग्लंडमधली वनडे सीरिज मंगळवारपासून सुरू झाली. याआधी टीम इंडियाने टेस्ट सीरिज 3-1 ने जिंकली, तर टी-20 मध्ये 3-2 ने विजय मिळवला. पहिल्या वनडेमध्ये रोहितने 42 बॉल खेळून 28 रनची खेळी केली, यामध्ये 4 फोरचा समावेश होता. बेन स्टोक्सच्या बॉलिंगवर जॉस बटलरने विकेटच्या मागे रोहितचा कॅच पकडला. पुण्यात रोहितला 4 वनडे मॅचमध्ये फक्त 85 रन करता आले आहेत, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 42 रन आहे. याशिवाय एका टी-20 मध्ये रोहित शून्य रनवर आणि टेस्टच्या एका इनिंगमध्ये 14 रनवर आऊट झाला. या मैदानात रोहितला अजून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक करता आलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन टी-20 मध्ये रोहित मैदानात उतरला. यातल्या पहिल्या दोन मॅचमध्ये तो 15 रन आणि 12 रन करून आऊट झाला, तर शेवटच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करून भारताला जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे भारताचा टी-20 सीरिजमध्ये 3-2ने विजय झाला. रोहितने त्याच्या वनडे करियरमध्ये 225 मॅचच्या 218 इनिंगमध्ये 49 च्या सरासरीने 9,143 रन केले आहेत, यामध्ये 29 शतकं आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने वनडेमध्ये तीन द्विशतकं केली आहेत, यातलं एका द्विशतकामध्ये त्याने 250 पेक्षा जास्त रन केले. नोव्हेंबर 2014 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यामध्ये 264 रनची खेळी केली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या