मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : कृणाल पांड्याने पहिल्याच मॅचमध्ये मोडला 31 वर्ष जुना विक्रम

IND vs ENG : कृणाल पांड्याने पहिल्याच मॅचमध्ये मोडला 31 वर्ष जुना विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमधून (India vs England) कृणाल पांड्याने (Krunal Pandya) वनडे क्रिकेटमध्ये (ODI) पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात कृणालने धमाकेदार कामगिरी केली. 31 बॉलमध्ये 58 रन करून तो नाबाद राहिला.

  • Published by:  Shreyas

पुणे, 23 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमधून (India vs England) कृणाल पांड्याने (Krunal Pandya) वनडे क्रिकेटमध्ये (ODI) पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात कृणालने धमाकेदार कामगिरी केली. 31 बॉलमध्ये 58 रन करून तो नाबाद राहिला. कृणालच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. 26 बॉलमध्येच कृणालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर झाला आहे.

कृणाल पांड्याने 31 वर्षांपूर्वीचा जॉन मॉरिस (John Morris) यांचा विक्रम मोडीत काढला. इंग्लंडच्या जॉन मॉरिस यांनी न्यूझीलंडविरुद्ध 35 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरलेल्या मॉरिस यांनी 45 बॉलमध्ये 63 रन केले होते. या खेळीमध्ये मॉरिस यांनी 6 फोर मारले.

तर भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात 7 किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना अर्धशतक करणारा कृणाल पांड्या तिसरा भारतीय बॅट्समन बनला आहे. याआधी साबा करीम यांनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफॉनटेनमध्ये 55 रन केले होते, तर रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये 2009 साली नाबाद 60 रनची खेळी केली होती. आता कृणाल पांड्याने पुण्यात 31 बॉलमध्ये नाबाद 58 रन केले.

ही विक्रमी खेळी केल्यानंतर कृणाल भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मिठी मारून ढसाढसा रडला. काहीच दिवसांपूर्वी कृणाल पांड्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या आठवणीने कृणालला अश्रू अनावर झाले.

पहिल्या वनडेआधी कृणालला त्याचा छोटा भाऊ हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वनडे कॅप दिली. भावाकडून कॅप घेताना कृणाल पांड्या भावुक झाला. ही कॅप त्याने आकाशाला दाखवली आणि आपल्या वडिलांची आठवण काढली. याचवर्षी जानेवारी महिन्यात हार्दिक आणि कृणालचे वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Krunal Pandya