Home /News /sport /

IND vs ENG : आऊट झाल्यानंतर विराटसोबत भिडला बटलर, पाहा VIDEO

IND vs ENG : आऊट झाल्यानंतर विराटसोबत भिडला बटलर, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाचव्या टी-20 मध्ये 36 रनने विजय मिळवला. पण या मॅचमध्ये विराट आणि जॉस बटलर (Jos Buttler) यांच्यात वाद झाला.

    अहमदाबाद, 21 मार्च : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाचव्या टी-20 मध्ये 36 रनने विजय मिळवला. विराटने या मॅचमध्ये नाबाद 80 रन केले, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही अर्धशतक केलं. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी फटकेबाजी करून भारताचा स्कोअर 224 रनपर्यंत पोहोचवला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची पहिली विकेट शून्य रनवरच गेली. यानंतर जॉस बटलर (Jos Buttler) आणि डेव्हिड मलान (David Malan) यांच्यात 130 रनची पार्टनरशीप झाली. बटलर आणि मलानच्या जोडीने भारतीय बॉलरना चांगलाच त्रास दिला. हे दोघं इंग्लंडला विजय मिळवून देतील, असं वाटत असतानाच भुवनेश्वर कुमारने ही जोडी फोडली. जॉस बटलरटा कॅच हार्दिक पांड्याने पकडला. 52 रनवर खराब शॉट मारून आऊट झाल्यामुळे बटलर निराश झाला, त्यामुळे पॅव्हेलियनमध्ये परतताना तो विराट कोहलीशी भिडला. 13 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरच्या बॉलिंगवर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना बटलर काहीतरी म्हणाला, त्यामुळे विराट कोहली भडकला आणि त्याने नाराजी जाहीर केली. यानंतर बटलरही तिकडे थांबला आणि कोहलीसोबत वाद घालायला लागला. या दोघांमध्ये नक्की काय वाद झाला, हे कळलं नाही. यानंतर कोहली अंपायरसोबतही बोलताना दिसला. बटलरची विकेट गेल्यानंतर इंग्लंडची बॅटिंग गडगडली. 20 ओव्हरमध्ये त्यांना 8 विकेट गमावून 188 रनच करता आल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, T20 cricket, Virat kohli

    पुढील बातम्या