मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : रोहितचं धडाकेबाज अर्धशतक, टी-20 मध्ये हा विक्रम करणारा दुसराच खेळाडू

IND vs ENG : रोहितचं धडाकेबाज अर्धशतक, टी-20 मध्ये हा विक्रम करणारा दुसराच खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये (India vs England) रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार अर्धशतक केलं. टी-20 करियरमधलं हे त्याचं 22वं अर्धशतक होतं.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये (India vs England) रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार अर्धशतक केलं. टी-20 करियरमधलं हे त्याचं 22वं अर्धशतक होतं.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये (India vs England) रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार अर्धशतक केलं. टी-20 करियरमधलं हे त्याचं 22वं अर्धशतक होतं.

अहमदाबाद, 20 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार अर्धशतक केलं. टी-20 करियरमधलं हे त्याचं 22वं अर्धशतक होतं. रोहितने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 5 सिक्स मारले. रोहितने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटसोबत (Virat Kohli) ओपनिंग केली. सीरिजमध्ये पहिल्यांदाच भारताला 50 पेक्षा जास्त रनची ओपनिंग पार्टनरशीप मिळाली.

रोहितने मागच्या 5 टी-20 इनिंगपैकी 3 वेळा 50 पेक्षा अधिक रनची खेळी केली. या मॅचआधी रोहितने या सीरिजमध्ये 15 आणि 12 रन केले होते, पण पाचव्या मॅचमध्ये त्याला अर्धशतक करण्यात यश आलं. जलद रन करण्याच्या नादात रोहित आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याला बोल्ड केलं. आऊट होण्याआधी रोहितने 34 बॉलमध्ये 64 रन केले होते. कोहलीसोबत त्याने ओपनिंगसाठी 94 रनची मोठी पार्टनरशीप केली होती.

64 रनच्या या खळीमध्ये रोहितने आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याने मार्टिन गप्टीलला (Martin Guptill) मागे टाकलं. गप्टिलने 99 टी-20 मॅचमध्ये 2,839 रन केले, तर रोहितच्या नावावर 111 टी-20 मॅचमध्ये 2,864 रन झाले आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये 3 हजारपेक्षा जास्त रन करणारा विराट एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 27 अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराटनेच केला आहे. तर रोहितच्या नावावर या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 4 आंतरराष्ट्रीय शतक करण्याचा विक्रम आहे. मार्टिन गप्टील आणि एरॉन फिंच यांच्या नावावर दोन-दोन शतकं आहेत.

या मॅचमध्ये पॉवर-प्लेमध्ये एकही विकेट न गमावता भारताने 60 रन केले. या सीरिजमधला पॉवर-प्लेमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी इंग्लंडने तिसऱ्या मॅचमध्ये एक विकेट गमावून 57 रन केले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma