अहमदाबाद, 20 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली 5 टी-20 मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीत आहे. चौथ्या टी-20 मध्ये भारताने इंग्लंडला विजयासाठी 185 रनचं आव्हान दिलं होतं, या आव्हानाचा पाठलाग करता इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 177 रन केले, त्यामुळे भारताचा 8 रननी विजय झाला. आता दोन्ही टीमचं लक्ष्य पाचवी मॅच जिंकून सीरिज खिशात टाकणं आहे. पण या मॅचआधी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) फिटनेसवर प्रश्न उपस्थित होत आहेत. चौथ्या मॅचमध्ये फिल्डिंगवेळी विराट कोहली मैदानाबाहेर गेला होता.
विराटच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व केलं, यानंतर हातातून गेलेल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. पण चौथ्या मॅचनंतर आपण पूर्णपणे फिट असल्याचं विराट कोहली म्हणाला. मॅचमध्ये फिल्डिंग करत असताना विराट बॉल पकडण्यासाठी पळाला आणि डाईव्ह मारून त्याने बॉल थ्रो केला. यावेळी विराटला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसली तरी कोणताही धोका नको म्हणून तो मैदानाबाहेर गेला. पाचव्या मॅचपर्यंत फिट होऊ, असा विश्वास विराटने व्यक्त केला.
विराट कोहली पाचव्या मॅचसाठी फिट नसेल तर रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व जाईल, तसंच विराटच्याऐवजी इशान किशनचं (Ishan Kishan) टीममध्ये पुनरागमन होईल. चौथ्या टी-20 आधी इशान किशन अनफिट झाल्यामुळे तो खेळू शकला नव्हता, त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी मिळाली होती. सूर्यकुमारनेही या संधीचं सोनं करत अर्धशतकी खेळी केली. आता विराट कोहली फिट असेल आणि इशान किशनही फिट झाला असेल, तर टीम निवड डोकेदुखी ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Ishan kishan, Rohit sharma, Sports, Suryakumar yadav, Virat kohli