Home /News /sport /

IND vs ENG : क्रिकेटमधून निवृत्ती नाही, तरी टीम इंडियाचा हा खेळाडू करणार कॉमेंट्री

IND vs ENG : क्रिकेटमधून निवृत्ती नाही, तरी टीम इंडियाचा हा खेळाडू करणार कॉमेंट्री

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs England) घोषणा झाली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) याचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तसंच भारताचा दिग्गज विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) निवड समितीची पहिली पसंत नसल्याचंही समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 23 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs England) घोषणा झाली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) याचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तसंच भारताचा दिग्गज विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) निवड समितीची पहिली पसंत नसल्याचंही समोर आलं आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतरही दिनेश कार्तिकसाठी भारतीय टीममध्ये जागा नाही. त्याने भारतासाठी 94 वनडे आणि 32 टी-20 खेळल्या. यात त्याने अनुक्रमे 30.2 आणि 33.2 च्या सरासरीने 1752 आणि 399 रन केले. कार्तिकने त्याची शेवटची वनडे न्यूझीलंडविरुद्ध जुलै 2019 साली खेळली. धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय निवड समिती आणि टीम प्रशासन युवा विकेट कीपरवर लक्ष ठेवून आहेत. यामध्ये केएल राहुल, संजू सॅमसन, इशान किशन आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकने निवृत्ती न घेता नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनेश कार्तिक आता भारत इंग्लंड यांच्यातल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये कॉमेंट्री करताना दिसेल. 22 फेब्रुवारीला स्काय स्पोर्ट्सने भारत-इंग्लंड मॅचच्या प्रसारणाचे अधिकार विकत घेतलं, तेव्हा त्यांनी कॉमेंट्री पॅनलचीही घोषणा केली. यामध्ये दिनेश कार्तिक एकमेव भारतीय खेळाडू आहे. कार्तिकशिवाय या पॅनलमध्ये डेव्हिड लॉईड, नासीर हुसेन, इयन वॉर्ड, इब्नी रॅनफोर्ड-ब्रेंट, मायकल अथर्टन, रॉब की आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश आहे. निवृत्ती न घेता कॉमेंट्री करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये हरभजन सिंग, गौतम गंभीर, पार्थिव पटेल आणि रॉबिन उथप्पा यांचाही समावेश होतो. या यादीत आता दिनेश कार्तिकचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिक सुरुवातीचे काही दिवस कॉमेंट्रीमध्ये सहभागी होणार नाही, कारण विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो तामीळनाडूकडून खेळेल. या स्पर्धेची लीग फेज एक मार्चला संपेल. तामीळनाडू त्यांची शेवटची लीग मॅच 28 फेब्रुवारीला खेळणार आहे, तर फायनल 14 मार्चला खेळवली जाणार आहे. तामीळनाडू जर दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचली तर कार्तिकला कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचायला वेळ लागेल. भारत आणि इंग्लड यांच्यात 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. याची सुरुवात 12 मार्चला सुरू होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या