Home /News /sport /

IND vs ENG : पुण्यात भारताचा दणदणीत विजय, कृणाल-कृष्णा पहिल्याच सामन्यात चमकले

IND vs ENG : पुण्यात भारताचा दणदणीत विजय, कृणाल-कृष्णा पहिल्याच सामन्यात चमकले

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 66 रनने दणदणीत विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 318 रनचा पाठलाग करताना इंग्लंडचा 42.1 ओव्हरमध्ये 251 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणारे कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) चमकले.

पुढे वाचा ...
    पुणे, 23 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 66 रनने दणदणीत विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 318 रनचा पाठलाग करताना इंग्लंडचा 42.1 ओव्हरमध्ये 251 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणारे कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) चमकले. प्रसिद्ध कृष्णाने 8.1 ओव्हरमध्ये 54 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूरला 3 आणि भुवनेश्वर कुमारला 2 विकेट मिळाल्या. कृणाल पांड्याला 1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 66 बॉलमध्येच सर्वाधिक 94 रन केले. जेसन रॉय (Jason Roy) आणि बेयरस्टो या ओपनिंग जोडीने इंग्लंडला धमाकेदार सुरूवात करून दिली. 14.2 ओव्हरमध्ये इंग्लंडने 135 रन गाठले, पण रॉयची विकेट गेल्यानंतर कोणाला मोठा स्कोअर करता आला नाही. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 317-5 पर्यंत मजल मारली आहे. आपली पहिलीच वनडे खेळणाऱ्या कृणाल पांड्याने 31 बॉलमध्ये नाबाद 58 रन केले, तर टी-20 सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या केएल राहुलनेही अर्धशतक केलं. राहुलने 43 बॉलमध्ये 62 रन केले. शिखर धवनचं शतक फक्त 2 रननी हुकलं. धवनने 106 बॉलमध्ये 98 रन केले. तर कर्णधार विराट कोहलीही अर्धशतक करूनच माघारी परतला. विराटने 60 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सचा 3 तर मार्क वूडला 2 विकेट मिळाल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही कृणाल पांड्याने केला आहे. कृणाल पांड्याने 26 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. पुण्याच्या स्टेडियमवर सीरिजच्या तीनही मॅच खेळवल्या जाणार आहेत. आता दुसरी वनडे 26 मार्चला होणार आहे. याआधी टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने आणि टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Krunal Pandya, Pune, Rishabh pant, Virat kohli

    पुढील बातम्या