Home /News /sport /

IND vs ENG : डेव्हिड मलानचा विक्रम, विराट-बाबरला मागे टाकलं

IND vs ENG : डेव्हिड मलानचा विक्रम, विराट-बाबरला मागे टाकलं

भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचा (India vs England) पराभव झाला, याचसोबत भारताने ही सीरिज 3-2 ने जिंकली. इंग्लंडने सीरिज गमावली असली तरी त्यांचा बॅट्समन डेव्हिड मलानच्या (David Malan) नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 21 मार्च : भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचा (India vs England) पराभव झाला, याचसोबत भारताने ही सीरिज 3-2 ने जिंकली. इंग्लंडने सीरिज गमावली असली तरी त्यांचा बॅट्समन डेव्हिड मलानच्या (David Malan) नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड मलानच्या नावावर झाला आहे. या मॅचमध्ये मलानने 68 रनची खेळी केली, पण मलानची ही खेळी व्यर्थ ठरली, कारण भारताचा या मॅचमध्ये 36 रनने विजय झाला. आता दोन्ही टीममध्ये 23 मार्चपासून वनडे सीरिजला सुरूवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 224 रन केले. भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा या फॉरमॅटमधला सर्वाधिक स्कोअर होता. या आव्हानाचा पाठलाग करताना मलान आणि बटलर इंग्लंडला जिंकवून देतील, असं वाटत होतं, पण या दोघांची विकेट पडताच इंग्लंडची बॅटिंग गडगडली, त्यामुळे त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रनपर्यंत मजल मारता आली. या मॅचमध्ये 65 वी रन करताच मलानने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार रनचा टप्पा ओलांडला. 24 व्या इनिंगमध्येच मलानने हे रेकॉर्ड केलं. मलानच्या आधी हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर होता. बाबर आझमने 26 इनिंगमध्ये आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 27 इनिंगमध्ये 1 हजार रनचा टप्पा पार केला. केएल राहुल (KL Rahul) आणि एरॉन फिंच (Aron Finch) यांनी प्रत्येकी 29-29 इनिंगमध्ये 1 हजार रन पूर्ण केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या