S M L

भारत विजयापासून एक पाऊल दूर,इंग्लंडवर पराभवाचे ढग!

पहिल्या कसोटीचा पराभवाचा बदला काढण्याची भारताला चालून संधी आली आहे.

Updated On: Aug 21, 2018 11:53 PM IST

भारत विजयापासून एक पाऊल दूर,इंग्लंडवर पराभवाचे ढग!

इंग्लंड, 21 आॅगस्ट : पहिल्या कसोटीचा पराभवाचा बदला काढण्याची भारताला चालून संधी आली आहे. भारताने मोठी आघाडी घेतली असून विजयापासून फक्त एक विकेट दूर आहे.  इंग्लंडला आपल्याच मायभूमीत पराभव करण्याची भारताला गोल्डन संधी आहे. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड 311 धावा 9 बाद अशी अवस्था आहे. इंग्लंडला अजून 210 धावांची गरज आहे. तर भारताला एकच गडी बाद करायचा आहे.

टीम इंडियाने चौथ्या दिवशी जबरदस्त खेळी करत लंच पर्यंत इंग्लंडचा धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या खेळाडूंचा निभाव लागू शकला नाही. जसप्रित ब्रुमराने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचे पाच खेळाडू बाद केले. तर ईशांत शर्माने 2 गडी बाद केले.

याआधी भारताने तिसऱ्या दिवशी आपली दुसरी इनिंग सात बाद 252 धावांवर घोषित केली. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 329 धावांची आघाडी घेतली. तिथे इंग्लंडने 161 धावांवर ढेर झाली. त्यामुळे भारताने इंग्लंडपुढे 521 धावांचे विशाल टार्गेट ठेवले आहे.

भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 103 धावा केल्या. कोहली व्यतिरिक्त 72 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 52 धावा करून नाबाद राहिला.

कोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड

Loading...
Loading...

इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतले २३ वे शतकझळकावले. या एका शतकासह विराटने पाच नवे रेकॉर्ड बनवले आहेत.

कसोटीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिवन स्मिथला विराटने मागे टाकले. सध्या स्मिथला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.

परदेशात कर्णधार पदाची धुरा सांभाळत शतक ठोकणाऱ्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. तसंच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत विराटने ४४० धावसंख्या करुन भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला मागे टाकले आहे. १९९० मध्ये अजहरुद्दीनने ४२६ धावा केल्या होत्या. कसोटीमध्ये २३ वे शतक झळकावून विराटने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे.

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 11:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close