S M L

IND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ६० धावांनी पराभव केला.

Updated On: Sep 2, 2018 11:39 PM IST

IND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ६० धावांनी पराभव केला. सॅम कुरानने आर. आश्र्विनला 25 धावांवर एलबीडब्ल्यू करून इंग्लंडने ही मालीका जिंकली. इंग्लंडने ही मालीका 3-1 ने आपल्या नावावर केली. एक कसोटी आणखी बाकी असली तरी, या पराभवामुळे भारताच्या मालीकेवर विपरीत परिणाम होणार आहे. यापूर्वीच्या तीन कसोट्या इंग्लंडने त्यांच्या नावावर केल्या असल्यामुळे, पाचवी कसोटी जरी भारताने जिंकली तरीही त्याचा फायदा भारताला होणार नाही.

चौथ्या डावात इंग्लंडने भारतापुढे २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताला ते लक्ष गाठता आले नाही. या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 58 धाव काढल्या, तर उपकर्णधार अजित रहाणे याने 51 धाव काढल्या. चौथ्या दिवसाचा खेळाला सुरूवात झाल्यानंतर इंग्लंडने केवळ 11 धावा काढल्या आणि दुसरा डाव संपला. इंग्लंडने ठेवलेले 245 धावांचे लक्ष गाठताना भारतीय खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. पुजाराही 5 धावांवर बाद झाला. सलामीवीर शिखर धवनने 17 धावा काढल्या.

चहापानापर्य़ंत भारताचे ३ गडी बाद 123 धावा झाल्या होत्या. चहापानापर्य़ंत विराट कोहली आणि अजित रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही अर्धशतक काढून बाद झाल्यामुळे भारताची अवस्था आणखीनच बिकट झाली. चहापानानंतर पांड्या (०), ऋषभ पंत (१८), रहाणे (५१), इशांत शर्मा (०), मोहम्मद शमी (८) आणि अश्विन (२५) असे ६ गडी भारताने गमावले. इंग्लंडकडून मोईन अली ४, स्टोक्स-अँडरसनने २-२ आणि ब्रॉड-कुर्रान १-१ बळी टिपला. इंग्लंडच्या संगात स्टुअर्ट ब्रॉड बाद झाल्यानंतर जोस बटलरने सर्वाधिक म्हणजे ६९ धावा केल्या. कर्णधार जो रूट ने ४८ काढल्या आणि धावचीत झाला. .

चौथ्या कसोटीत जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ 3-1 ने अघाडीवर आहे. मालिकेली तीन कसोट्या आपल्या नावावर केल्यामुळे आता मालीकेची पाचवी कसोटी जरी भारताने जिंकली तरीसुद्धा त्याचा फायदा भारताला होणार नाही. येत्या 7 सप्टेंबर पासून मालीकेच्या पाचव्या कसोटी सामन्याला लंडनमध्ये सुरूवात होतेय.

 Asian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 11:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close