Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला मैदानातच दुखापत

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला मैदानातच दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. एकीकडे या टेस्टमध्ये भारतीय टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचली असली, तरी टीमला मोठा धक्का लागला आहे. टीमचा महत्त्वाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दुखापतीमुळे दुसऱ्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 14 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या 161 रन तसंच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा पहिल्या इनिंगमध्ये 329 रनवर ऑल आऊट झाला. एकीकडे या टेस्टमध्ये भारतीय टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचली असली, तरी टीमला मोठा धक्का लागला आहे. टीमचा महत्त्वाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दुखापतीमुळे दुसऱ्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. बीसीसीआयने चेतेश्वर पुजाराच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवशी बॅटिंग करत असताना पुजाराच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे पुजाराला मैदानात न उतरवण्याचा निर्णय टीम प्रशासनाने घेतला. पुजाराच्याऐवजी मयंक अग्रवाल फिल्डिंगसाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पुजारा 21 रनवर आऊट झाला. टीम इंडियाची पहिली विकेट शून्य रनवर गेली, शुभमन गिल खातंही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पुजाराने रोहितच्या मदतीने भारतीय डाव सावरला, त्यावेळी बॉल पुजाराच्या उजव्या हाताला लागला. या दुखापतीनंतर पुजारा जास्तकाळ क्रीजवर टिकला नाही. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पुजाराने फास्ट बॉलिंगचा सामना केला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये 11 वेळा पुजाराच्या शरिराला बॉल लागला, तरीही त्याने हिंमत हरली नाही. शेवटच्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्त बॉल खेळत पुजाराने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पुजाराने ब्रिस्बेन टेस्टमध्ये 56 रनची खेळी केली होती. पुजाराच्या या इनिंगमुळे भारताने ब्रिस्बेन टेस्टच जिंकली नाही, तर ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजही 2-1ने खिशात टाकली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या