अहमदाबाद, 6 मार्च : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) प्रवेश केला आहे. 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात ही फायनल खेळवली जाईल. चौथ्या टेस्टमध्ये भारताने इंग्लंडचा (India vs England) इनिंग आणि 25 रनने पराभव केला. याचसोबत भारताने ही सीरिजही 3-1 ने जिंकली.
चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना अपयश आलं असताना ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. ऋषभ पंत याने 101 रनची तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 96 रनची खेळी केली. अक्षर पटेल आणि अश्विन यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.
इंग्लंडविरुद्धच्या या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. 'चेन्नईतल्या पहिल्या मॅचमधल्या पराभवानंतर टीमच्या पुनरागमनामुळे उत्साही होतो. पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने आम्हाला धोबी पछाड दिली. टॉसनेही महत्त्वाची भूमिका निभावली. जास्त उत्साहाने आम्ही बॉलिंग आणि फिल्डिंग केली. त्यामुळे पुनरागमनासाठी आनंदी आहे. आमची बेंच स्ट्रेन्थ खूप मजबूत आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले संकेत आहेत. जेव्हा बदलाव होईल, तेव्हा भारतीय क्रिकेटचा स्तर खालावणार नाही,' असा विश्वास विराटने व्यक्त केला.
तर दुसरीकडे पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानेही प्रतिक्रिया दिली. पहिली मॅच सकारात्मक होती. शेवटच्या तीन मॅचमध्ये आम्ही भारताची बरोबरी करू शकलो नाही. हा अनुभव आणि सीरिजमधून आम्हाला शिकण्याची आणि अधिक चांगलं होण्याची गरज आहे, असं मत रूटने मांडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Virat kohli