IND vs ENG : टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत, इंग्लंड दौऱ्यातून बाहेर

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs England) दुखापतींचं ग्रहण सुटत नाहीये. शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्यानंतर आता टीमचा फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) याला दुखापत झाली आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs England) दुखापतींचं ग्रहण सुटत नाहीये. शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्यानंतर आता टीमचा फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) याला दुखापत झाली आहे.

  • Share this:
    डरहम, 21 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs England) दुखापतींचं ग्रहण सुटत नाहीये. शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्यानंतर आता टीमचा फास्ट बॉलर आवेश खान याला दुखापत झाली आहे. डरहममध्ये भारताच्या सराव सामन्यामध्ये आवेश खानला (Avesh Khan) दुखापत झाली. भारत आणि काऊंटी इलेव्हन यांच्यातल्या सामन्यात आवेश खानच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळे तो मॅचमधून बाहेर झाला. आता इंग्लंड दौऱ्यालाही तो मुकणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे काऊंटी टीमच्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावं लागलं, त्यामुळे आवेश खान या काऊंटी टीमकडून खेळायला उतरला. आवेश खान इंग्लंड दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेला आहे. दुखापतीमुळे तो 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितलं आहे. आवेश खान नसल्यामुळे आता टीम इंडियाकडे एक नेट बॉलर कमी असेल. 'ही मॅच तर सोडून द्या, या सीरिजमध्येही त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे, त्यामुळे तो कमीत कमी एक महिना बॉलिंग करू शकणार नाही. यानंतर त्याचं रिहॅब सुरू केलं जाईल, पुढच्या तीन दिवसांमध्ये स्थिती स्पष्ट होईल,' असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. बीसीसीआयने सुरुवातीला आवेश खानच्या दुखापतीबाबत फार माहिती दिली नव्हती. मेडिकल टीम त्याची तपासणी करत आहे, सराव सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आवेश खान खेळणार नाही, एवढंच बीसीसीआयने सांगितलं होतं. मंगळवारी लंचनंतर आपल्या 10 व्या ओव्हरच्या 5व्या बॉलला आवेश खानला दुखापत झाली. हनुमा विहारीने मारलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करताना आवेश खानच्या अंगठ्याला बॉल लागला. 24 वर्षांच्या आवेश खानने 26 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. याआधी शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) कंबरदुखीमुळे आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हॅमस्ट्रिंगमुळे सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले नाहीत.
    Published by:Shreyas
    First published: