मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'...तर अर्धी मिशी काढून खेळेन', अश्विनचं पुजाराला चॅलेंज!

'...तर अर्धी मिशी काढून खेळेन', अश्विनचं पुजाराला चॅलेंज!

भारतीय टीमचा वरिष्ठ खेळाडू आणि स्टार स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी (India vs England) चॅलेंज दिलं आहे.

मुंबई, 26 जानेवारी : भारतीय टीमचा वरिष्ठ खेळाडू आणि स्टार स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी (India vs England) चॅलेंज दिलं आहे. पुजाराने हे चॅलेंज पूर्ण केलं, तर आपण अर्धी दाढी-मिशी ठेवू, असं अश्विन म्हणाला आहे. अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर भारताचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) यांच्याशी बोलत होता.

या दोघांमध्ये चर्चा सुरू असताना अश्विनने विक्रम राठोड यांना विचारलं, 'पुजाराला ऑफ स्पिनरच्या बॉलवर क्रीज सोडून पुढे येऊन हवेत बॉल मारताना कधी बघणार?' त्यावर उत्तर देताना विक्रम राठोड म्हणाले, 'कार्य प्रगतीवर आहे. मी त्याला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी एक शॉट तरी हवेत मार, पण तो अजूनपर्यंत ऐकत नाही.'

विक्रम राठोड यांच्या या उत्तरानंतर अश्विनने पुजाराला चॅलेंज दिलं. 'जर पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये मोईन अली किंवा अन्य स्पिनरला क्रीजच्या पुढे येऊन हवेत शॉट मारला, तर आपण अर्धी मिशी काढून मॅच खेळण्यासाठी उतरू,' असं अश्विन म्हणाला. पुजारा हे चॅलेंज पूर्ण करेल, असं मला वाटत नसल्याचं विक्रम राठोड म्हणाले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पुजाराने अनेकवेळा शरिरावर बाऊन्सर झेलले, तरीही तो खेळपट्टीवर टिकून राहिला. अनेकवेळा आपल्या संथ खेळीमुळे टीका होत असलेला पुजारा ब्रिस्बेन टेस्टमध्ये योध्याप्रमाणे खेळला. पुजाराच्या शरिरावर, बोटांवर आणि डोक्यावरही बाऊन्सर लागले, पण त्याने मैदान सोडलं नाही. भिंतीप्रमाणे तो ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्ससमोर उभा राहिला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या दोन मॅच चेन्नईमध्ये तर उरलेले सामने अहमदाबादच्या मोटेरामध्ये होतील.

First published:
top videos