मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडमधून आली वाईट बातमी, IPL साठी धोक्याची घंटा!

IND vs ENG : इंग्लंडमधून आली वाईट बातमी, IPL साठी धोक्याची घंटा!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India tour of England) मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर यामुळे पाचवी टेस्ट आणि आयपीएलदेखील (IPL 2021) संकटात सापडली आहे.

  • Published by:  Shreyas

मॅनचेस्टर, 9 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India tour of England) मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानंतर भारतीय टीममधल्या आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडियाचा हा सदस्य सपोर्ट स्टाफपैकी एक असल्याचं वृत्त इएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे.

बुधवारी संध्याकाळी झालेल्या टेस्टमध्ये या सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर आता टीम इंडियाच्या सगळ्या सदस्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे खेळाडू हॉटेलमध्येच असतील. तसंच खेळाडूंचं सराव सत्रही रद्द करण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे, पण याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत.

टीम इंडियातला आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट संकटात सापडली आहे. एवढंच नाही तर आयपीएलसाठीही ही धोक्याची घंटा ठरू शकते. 14 सप्टेंबरला पाचवी टेस्ट संपल्यानंतर खेळाडू लगेच आयपीएलसाठी युएईला रवाना होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. टीम इंडियातल्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल, त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईला वेळेवर पोहोचता येणार नाही. एवढच नाही तर यामुळे आयपीएलही संकटात येईल.

कोरोना व्हायरसमुळे आधीच आयपीएल मे महिन्यात स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात भारतात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं, पण आयपीएल टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने मे महिन्यात स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

First published:

Tags: Coronavirus, India vs england, IPL 2021