IND vs ENG : इंग्लंडच्या पराभवानंतर या महिलेला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण

IND vs ENG : इंग्लंडच्या पराभवानंतर या महिलेला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा (India vs England) 3-1 ने पराभव झाला. यानंतर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्स हार्टलीला (Alex Hartley) जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मार्च : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा (India vs England) 3-1 ने पराभव झाला. यानंतर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्स हार्टलीला (Alex Hartley) जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या डे-नाईट टेस्टमध्ये भारताचा 10 विकेटने दणदणीत विजय झाला, यानंतर एलेक्सला सोशल मीडियावर ही धमकी मिळाली. तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर एलेक्सने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये एलेक्सने इंग्लंडच्या टीमला ट्रोल केलं होतं. इंग्लंडची महिला टीम खेळण्यासाठी मैदानात उतरण्याआधीच पुरुष टीमने मॅच संपवून चांगलं काम केलं, असं ट्विट एलेक्सने केलं होतं.

एलेक्सच्या या ट्विटवर इंग्लंडचा क्रिकेटपटू रोरी बर्न्स चांगलाच संतापला. 'निराश करणारं ट्विट. आमची टीम महिला क्रिकेटला पाठिंबा देते,' असं बर्न्स म्हणाला, पण काही वेळातच त्याने हे ट्विट डिलीट केलं. बर्न्सच्या या ट्विटला बेन स्टोक्स आणि जेम्स अँडरसननेही लाईक केलं होतं.

या ट्विटनंतर एलेक्सवर सोशल मीडियावरून टीका करण्यात आली. माझ्याबाबत बरेच अपशब्द वापरण्यात आले आणि जीवे मारण्याचीही धमकी मिळाली, असा दावा एलेक्सने केला.

द गार्डियनसोबत बोलताना एलेक्स म्हणाली, 'माझ्या ट्विटला चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. मी इंग्लंडच्या पराभवाचं सेलिब्रेशन करत आहे, अशा पद्धतीने त्या ट्विटकडे पाहिलं गेलं, पण असं काहीच नव्हतं. रोरी बर्न्सने ट्विट करण्याआधी सगळं बरोबर होतं. आम्ही महिला टीमची मॅच बघू, असं अनेकांनी सांगितलं. पण रोरीच्या कमेंटनंतर लोकांनी अपशब्द वापरायला सुरूवात केली.'

'यामुळे मी खूप निराश झाले. बर्न्सच्या ट्विटला इंग्लंडचे खेळाडू, मॅनेजमेंट, स्टाफने लाईक केलं. बर्न्सच्या ट्विटनंतर मला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाली,' अशी प्रतिक्रिया एलेक्सने दिली.

Published by: Shreyas
First published: March 7, 2021, 6:34 PM IST

ताज्या बातम्या