मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'आता विराट कॅप्टन झाल्यामुळे माझं काम...' रहाणेचं स्पष्ट उत्तर

IND vs ENG : 'आता विराट कॅप्टन झाल्यामुळे माझं काम...' रहाणेचं स्पष्ट उत्तर

अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी (India vs England) विराट कोहलीचं (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे तो पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 4 फेब्रुवारी : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी (India vs England) विराट कोहलीचं (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे तो पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे. विराट कर्णधार झाल्यामुळे आता आपण त्याची मदत करणार असल्याचं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट सीरिज जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची दुसरी टीम ठरवेल. न्यूझीलंडची टीम आधीच फायनलला क्वालिफाय झाली आहे.

'माझं काम मागून विराटला मदत करणं आहे. आता माझं काम खरंच सोपं झालं आहे. जेव्हा विराट मला विचारेल तेव्हा मी त्याला सांगेन. कौटुंबिक कारणांमुळे विराट भारतात परतला होता. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियात कर्णधार झालो. ऑस्ट्रेलियातला विजय आता इतिहास झाला आहे,' असं स्पष्ट मत रहाणेने मांडलं.

'ऑस्ट्रेलियातला विजय आता मागची गोष्ट आहे. आता आम्ही वर्तमानात आहोत. आम्ही इंग्लंडच्या टीमचा सन्मान करतो. त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळू इच्छीतो. इंग्लंडच्या टीमला आम्ही हलक्यात घेत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला तीन-चार महिने बाकी आहेत. पण आमचं लक्ष्य सध्याच्या सीरिजवर आहे. न्यूझीलंड खूप चांगलं क्रिकेट खेळल्यामुळे ते फायनलमध्ये पोहोचले,' अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.

चेन्नई टेस्टमध्ये अक्षर पटेलला पदार्पणाची संधी मिळेल का? असा प्रश्न रहाणेला विचारण्यात आला तेव्हा त्याने याबाबत थेट उत्तर दिलं नाही. गुरूवारच्या सरावानंतर आम्ही टीमबाबत ठरवू. भारतीय खेळपट्टीवर नेहमीच स्पिनरना मदत मिळते, असं रहाणेने सांगितलं.

First published: