IND vs ENG : इंग्लंडविरुद्धचं अजिंक्य रहाणेचं योगदान विसरू नका!

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धचं अजिंक्य रहाणेचं योगदान विसरू नका!

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधल्या (India vs England) त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण सीरिजमधल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कामगिरीकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 1 मार्च : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधल्या (India vs England) त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण सीरिजमधल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कामगिरीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलं, एवढंच नाही तर या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने ऐतिहासिक विजय झाला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऍडलेडला झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा लाजीरावणा पराभव झाला होता. यानंतर रहाणेने मेलबर्न टेस्टमध्ये शतक केलं. या शतकानंतर टीम इंडियाने सीरिजमध्ये पुनरागमन केलं.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर भारताचा मुकाबला इंग्लंडशी होत आहे. या सीरिजसाठी कर्णधार विराट कोहलीचं पुनरागमन झालं. सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये खेळवण्यात आल्या. पहिल्या मॅचमध्ये भारताचा 227 रननी पराभव झाला, तर दुसरी टेस्ट भारताने 317 रनने जिंकली. या मॅचमध्ये रहाणेने 67 रनची महत्त्वाची खेळी केली. रोहित शर्मासोबत रहाणेनेही टीम इंडियाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.

पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारताने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या सत्रात 3 विकेट गमावून 86 रन केले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी 162 रनची पार्टनरशीप केली. या पार्टनरशीपमुळे मॅचची दिशा बदलली. मेलबर्नमध्ये 112 आणि नाबाद 27 रन करणाऱ्या रहाणेने ऑस्ट्रेलियात पुढे 22, 4, 37 आणि 24 रन केले. इंग्लंडविरुद्ध त्याने 1, 0, 67, 10 आणि 7 रनची खेळी केली.

अजिंक्य रहाणेच्या या कामगिरीवर त्याचे प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या खेळपट्ट्या कठीण आहेत. त्यामुळे अनेक शतकं होताना दिसत नाहीत. मागच्या 8 टेस्ट मॅचमध्ये कोणत्याही भारतीयाने शतक केलं नाही. कमी शतकांचा अर्थ खेळपट्टी बॅट्समनसाठी सोपी नाही. दुसऱ्या टेस्टमधली रोहित आणि रहाणेची इनिंग महत्त्वाची होती. त्यामुळे भारताचा विजय झाला. प्रत्येकवेळी तुम्ही मोठा स्कोअर करू शकत नाही,' असं आमरे म्हणाले.

दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही अजिंक्य रहाणेचं समर्थन केलं. हा फक्त एक टेस्ट आणि दोन इनिंगचा प्रश्न आहे. पहिल्या इनिंगमध्ये रूटने अजिंक्यचा चांगला कॅच पकडला. जर बॉल बाऊंड्रीकडे गेला असता तर त्याने रन केल्या असत्या. ही काही अडचण नाही, प्रत्येक खेळाडू चांगला खेळत आहे, असं विराट म्हणाला.

Published by: Shreyas
First published: March 1, 2021, 3:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या