Home /News /sport /

IND vs ENG : राहुलचा फ्लॉप शो, आकाश चोप्राने करून दिली धोनीच्या त्या निर्णयाची आठवण

IND vs ENG : राहुलचा फ्लॉप शो, आकाश चोप्राने करून दिली धोनीच्या त्या निर्णयाची आठवण

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडिया (India vs England) अडचणीत सापडली आहे. 3 पैकी 2 मॅचमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला आहे. सीरिजमध्ये टीम इंडियाची सगळ्यात मोठी अडचण केएल राहुलचा (KL Rahul) फॉर्म राहिली.

    अहमदाबाद, 18 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडिया (India vs England) अडचणीत सापडली आहे. 3 पैकी 2 मॅचमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला आहे. यानंतर आता एकाही मॅचमध्ये पराभव झाला तर भारताच्या हातातून सीरिजही जाईल. सीरिजमध्ये टीम इंडियाची सगळ्यात मोठी अडचण केएल राहुलचा (KL Rahul) फॉर्म राहिली. राहुलला 3 मॅचमध्ये फक्त एकच रन करता आली. मागच्या दोन मॅचमध्ये तर राहुल शून्य रनवर आऊट झाला. यानंतर आता चौथ्या मॅचआधी माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने (Aakash Chopra) टीम इंडियाला खास सल्ला दिला आहे. राहुलवर विश्वास ठेवला पाहिजे, पण त्याच्या बॅटिंगचा क्रम बदलला पाहिजे, असं आकाश चोप्रा म्हणाला. आकाश चोप्राने चौथ्या टी-20 आधी एक ट्वीट केलं. राहुलला ओपनिंगला पाठवण्याऐवजी त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात यावं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनने (Ishan Kishan) ओपनिंगला खेळावं, तसंच विराटने तिसऱ्या क्रमांकावर आणि राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवावं, असं आकाश चोप्रा म्हणाला. आपल्या या ट्वीटमध्ये आकाश चोप्राने धोनीच्या (MS Dhoni) निर्णयाचं उदाहरण दिलं. 2014 साली जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरला, त्यानंतर वेस्ट इंडिज सीरिजमध्ये धोनीने कोहलीचा क्रम बदलला आणि त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. कधी-कधी बॅट्समनला खाली खेळवलं, तर त्याचा फॉर्म परत येतो, असं ट्वीट आकाश चोप्राने केलं. जर केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं तर संपूर्ण बॅटिंग ऑर्डरच बदलून जाईल. मागच्या तिन्ही मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणारा ऋषभ पंत (Rishabh Pant) पाचव्या क्रमांकावर खेळेल, मग सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टीममध्ये संधी मिळणार नाही. दुसऱ्या टी-20 मधून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं होतं. त्या मॅचमध्ये सूर्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, पण लगेचच पुढच्या मॅचमधून त्याला बाहेर बसवण्यात आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Ishan kishan, Kl rahul, MS Dhoni, Rishabh pant, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या