मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियातल्या आणखी एकाला कोरोना, संपूर्ण टीम हॉटेलमध्ये क्वारंटाईन

IND vs ENG : टीम इंडियातल्या आणखी एकाला कोरोना, संपूर्ण टीम हॉटेलमध्ये क्वारंटाईन

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातल्या (India tour of England) आणखी एका सदस्याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. हा सदस्य सपोर्ट स्टाफपैकी एक असल्याची माहिती मिळत आहे.

  • Published by:  Shreyas

मॅनचेस्टर, 9 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातल्या (India tour of England) आणखी एका सदस्याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. हा सदस्य सपोर्ट स्टाफपैकी एक असल्याची माहिती मिळत आहे. या सदस्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे टीम इंडियाचं (Team India) सराव सत्रही रद्द करण्यात आलं आहे, तसंच संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्येच राहावं लागणार आहे

बुधवारी संध्याकाळी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये टीम इंडियाच्या एका सदस्य पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.

टीम इंडियातला आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या टेस्टवर संकट ओढावलं आहे. सीरिजची अखेरची टेस्ट शुक्रवारपासून मॅनचेस्टरमध्ये सुरू होणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीम 2-1 ने आघाडीवर आहे.

याआधी टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली. यानंतर आता आता टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली. टीम इंडियाचे हे तिन्ही सदस्य आता लंडनमध्येच क्वारंटाईन झाले आहेत.

रवी शास्त्री टीम हॉटेलमध्येच आपल्या पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी शास्त्री कोरोनाच्या संपर्कात आल्याचं वृत्त आहे. या कार्यक्रमात भरत अरुण, नितीन पटेल आणि आर.श्रीधरदेखील सहभागी झाले होते.

First published:

Tags: Coronavirus, India vs england