IND vs ENG : इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत गुंडाळला

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा काढल्या, तर भारताने नाबाद 19 धावा काढल्या.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2018 11:55 PM IST

IND vs ENG : इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत गुंडाळला

इंग्लंड, 30 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा काढल्या, तर भारताने नाबाद 19 धावा काढल्या. आज मोईन अलीची साथ मिळताच सॅम कुरानने 136 चेंडूंत 78 धावा काढत भारतीय गोलंदाजांच्या अक्षरशः नाकी नऊ आणले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. सलामीवीर किटन जेनींग्ज शून्यावर बाद झाला. बुमराहने त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार जो रूट ४ धावा काढल्या तर जॉनी बेअरस्टो ६ धावा करून तंबूत परतला. इशांत शर्मा आणि बुमराह यांनी अनुक्रमे त्यांना माघारी धाडले. काही वेळच तग धरू शकलेल्या कुकचा हार्दिक पांड्याने त्याचा काटा काढला.

दुसऱ्या सत्रात स्टोक्स २३ धावांवर तर बटलर २१ धावांवर बाद झाला. दोनही बळी शमीने घेतला. त्यानंतर सॅम कुर्रान आणि मोईन अली यांने किल्ला लढवला. पण अश्विनने ही जोडी तिसऱ्या सत्रात तोडली. मोईन अली ४० धावांवर बाद झला. तर त्याच पाठोपाठ इशांत शर्माने आदिल रशीदला पायचीत केले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड बाद झाला. अखेर भारतीय गोलंदाजांना भारी पडलेला कुरान त्रिफळाचित झाला. भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी घेतला.

दरम्यान, मालिकेतील पहिल्या दोन कसोटी इंग्लंडच्या नावावर आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताने पुनरागमन करत मालिकेत २-१ असे आपले आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे, तर भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जायबंदी ख्रिस वोक्सच्या जागी सॅम कुर्रानला, तर ओली पोपच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तर भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 VIDEO : जिन्सन जॉन्सनने केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित केलं सुवर्णपदक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 11:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...