मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ऋषभ पंतने वाढदिवशी उडवली शमीची खिल्ली, पण स्वत:च झाला ट्रोल

IND vs ENG : ऋषभ पंतने वाढदिवशी उडवली शमीची खिल्ली, पण स्वत:च झाला ट्रोल

शमीला ट्रोल करणं पंतला पडलं महागात

शमीला ट्रोल करणं पंतला पडलं महागात

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा (Mohammad Shami) आज वाढदिवस आहे. पण ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याला शुभेच्छा देताना खिल्ली उडवली. पंतला मात्र त्याची ही पोस्ट चांगलीच महागात पडली.

  • Published by:  Shreyas

लंडन, 3 सप्टेंबर : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा (Mohammad Shami) आज वाढदिवस आहे. 3 डिसेंबर 1990 ला जन्मलेला शमी आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या (India vs England Test Series 2021) पहिल्या तिन्ही टेस्टमध्ये शमीने चांगली बॉलिंग केली, पण चौथ्या टेस्टमध्ये फिट नसल्यामुळे त्याला बाहेर बसावं लागलं. शुक्रवारी टीम इंडियाच्या खेळाडूंनी शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याला शुभेच्छा देताना खिल्ली उडवली. पंतला मात्र त्याची ही पोस्ट चांगलीच महागात पडली. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी पंतला चांगलंच सुनावलं.

'मोहम्मद शमी भाई, बॉल आणि वय वेगाने निघून जात आहे, हॅपी बर्थडे,' असं ट्वीट ऋषभ पंतने केलं. चाहत्यांनी मात्र या ट्वीटवरून पंतला ट्रोल केलं. तुझीही वेळ निघून जात आहे, असाच फेल होत राहिलास तर आणखी कोणीतरी तुझी जागा घेईल, असं एक चाहता म्हणाला.

'टेस्ट क्रिकेट समजायला तुला आणखी किती इनिंग लागणार आहेत? एका सीरिजमध्ये तुझी आक्रमकता कामाला आली. प्रत्येक वेळी येणार नाही. टीमला कमजोर करू नकोस,' अशी टीका एकाने केली.

'भावा तुझी वेळही निघून जात आहे. इशान किशन तुझी जागा घेण्यासाठी तयार आहे. असाच खेळत राहशील तर टीमबाहेर जावं लागेल,' अशी प्रतिक्रिया एकाने दिली.

ऋषभ पंतला या सीरिजमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही. 6 टेस्ट इनिंगमध्ये पंतने 16 च्या सरासरीने 96 रन केले, त्याचा सर्वाधिक स्कोअर 37 रन आहे. चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम बिकट अवस्थेमध्ये होती, तरी पंतने अत्यंत खराब शॉट मारला. या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही पंत असाच खेळला, तर चौथ्या टेस्टमध्ये ऋद्धीमान साहाला संधी दिली जाऊ शकते.

First published:

Tags: India vs england, Rishabh pant