लंडन, 4 सप्टेंबर : ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी टीम इंडियाला (India vs England 4th Test) चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 83 रनची पार्टनरशीप केली. या दोघांची जोडी सेट झालेली वाटत असतानाच जेम्स अंडरसनने (James Anderson) भारताला धक्का दिला. 34 व्या ओव्हरमध्ये राहुल 46 रन करून आऊट झाला, पण राहुलच्या विकेटवरून वाद पाहायला मिळाला. विकेट कीपर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) राहुलचा कॅच पकडला, पण अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं, यानंतर इंग्लंडने डीआरएस (DRS) घेतला. थर्ड अंपायरने राहुलला आऊट दिलं, पण या निर्णयानंतर राहुलला धक्का बसला, नाराजी व्यक्त करत राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला.
केएल राहुलच नाही तर कॉमेंट्री करणारे सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) या निर्णयावर नाराज झाले. थर्ड अंपायरच्या निर्णयावर गावसकर यांनी आक्षेप घेतले. तर सोशल मीडियावरही अनेकांनी राहुल नॉट आऊट असल्याचं सांगितलं. थोड्या वेळानंतर रिप्ले बघितल्यानंतर मात्र राहुल आऊट असल्याचं स्पष्ट झालं.
Had to be a terrific ball to end this partnership ⚡ KL Rahul has to head back, just shy of his fifty ☹️ Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #KLRahul #Wicket pic.twitter.com/8cz0WAwlBj
— SonyLIV (@SonyLIV) September 4, 2021
जेम्स अंडरसनने टाकलेला बॉल आऊट स्विंग झाला, या बॉलवर खेळण्याचा राहुलने प्रयत्न केला, पण यात त्याची चूक झाली. बॉल बॅटला लागला, तसंच राहुलची बॅट पॅडलाही लागली. अल्ट्रा एजमध्येही एकदा बॉल बॅटला लागल्याचं आणि एकदा बॅट पॅडला लागल्याचं दिसून आलं. थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर मात्र राहुलने आपली नाराजी व्यक्त केली.
केएल राहुलने दुसऱ्या इनिंगमध्ये 46 रनची खेळी केली, याचसह त्याने या सीरिजमध्ये 300 रनही पूर्ण केले. केएल राहुलने या सीरिजमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक केलं आहे. रोहित शर्मासोबत राहुलने सीरिजमध्ये अनेकवेळा भारताला चांगल्या सुरुवात करून दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Kl rahul