मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : त्याला पोलिसांच्या दांडक्याची गरज, मैदानातील प्रकार पाहून सेहवाग संतापला

IND vs ENG : त्याला पोलिसांच्या दांडक्याची गरज, मैदानातील प्रकार पाहून सेहवाग संतापला

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सीरिजदरम्यान (India vs England Test Series) मूळचा इंग्लंडचा असलेला पण भारतीय क्रिकेट टीमचा फॅन चांगलाच लोकप्रिय झाला. लागोपाठ तीन टेस्टमध्ये जारव्हो (Jarvo) टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात उतरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 4 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सीरिजदरम्यान (India vs England Test Series) मूळचा इंग्लंडचा असलेला पण भारतीय क्रिकेट टीमचा फॅन चांगलाच लोकप्रिय झाला. लागोपाठ तीन टेस्टमध्ये जारव्हो (Jarvo) टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात उतरला. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचआधी जारव्हो मैदानात घुसला. बॉलिंग करण्यासाठी तो मैदानात आला होता, पण यावेळी त्याने नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) धक्का दिला. जारव्होच्या या वर्तनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) चांगलाच भडकला.

जारव्हो मैदानात आला तेव्हा सेहवाग हिंदीमध्ये कॉमेंट्री करत होता. जर जारव्होने अशा प्रकार दिल्ली किंवा पंजाबमध्ये केला असता तर त्याला पोलिसांचे दांडकेच पडले असते, अशी प्रतिक्रिया दिली. सेहवागसोबत कॉमेंट्री करणाऱ्या आशिष नेहरानेही (Ashish Nehra) सेहवागच्या वक्तव्याचं समर्थन केलं. लातों के भूत बातों से नहीं मानते, असं नेहरा म्हणाला. वसीम जाफर (Wasim Jaffer) यानेही इंग्लंडच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

तर लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी इंग्लंडच्या मैदानातल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची गरज आहे, अशी मागणी केली. ही सुरक्षेची गंभीर चूक आहे, असं ट्वीट हर्षा भोगलेंनी केलं.

वारंवार नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे आणि टीका होत असल्यामुळे अखेर जारव्होला लंडन पोलिसांनी अटक केली आहे.

First published: