• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आलेल्या जार्वोवर 'कडक' कारवाई

IND vs ENG : टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आलेल्या जार्वोवर 'कडक' कारवाई

तिसऱ्या टेस्टमध्ये मैदानात पुन्हा आला जारवो

तिसऱ्या टेस्टमध्ये मैदानात पुन्हा आला जारवो

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजदरम्यान (India vs England) डॅनियल जार्विस म्हणजेच जार्वो या युट्यूबरवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

 • Share this:
  हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजदरम्यान (India vs England) डॅनियल जार्विस म्हणजेच जार्वो या युट्यूबरवर कडक कारवाई करण्यात आली आहे. लॉर्ड्स आणि लीड्स टेस्टमध्ये सुरक्षा भेदून मैदानात येणाऱ्या जार्वोवर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात उतरलेला जार्वो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला होता. कोरोनाच्या संकटात बाहेरची एखादी व्यक्ती खेळाडूंच्या एवढ्या जवळ कशी येऊ शकते? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. जार्वोला आता आयुष्यभर लीड्स मैदानात प्रवेश मिळणार नाही. यॉर्कशायर काऊंटीचे प्रवक्त्यांनी पीटीआय भाषाशी बोलताना याबाबत माहिती दिली. याशिवाय त्याच्यावर आर्थिक दंडाची कारवाईही करण्यात येणार आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर जार्वो मैदानात बॅटिंगसाठी उतरला. लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशीही जारवो मैदानात बॉलिंग करण्यासाठी आला होता. यावेळी मात्र तो हेल्मेट आणि मास्क घालून बॅटिंगसाठी मैदानात उतरला. धक्कादायक म्हणजे जारवो पिचपर्यंत पोहोचला, तरी सुरक्षा रक्षकांना हे लक्षातही आलं नाही. यानंतर जारवोला पकडून त्याला बाहेर नेण्यात आलं. जारवोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लॉर्ड्स टेस्टमध्येही जारवो टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आला होता. सुरक्षा रक्षक, प्रेक्षक, कॉमेंटेटर आणि खेळाडू जारवोला पुन्हा पाहून आश्चर्यचकीत झाले.
  Published by:Shreyas
  First published: