Home /News /sport /

IND vs ENG : ऐतिहासिक लॉर्ड्सवर रोहितचं शतक हुकलं, अँडरसनच्या अप्रतिम बॉलनं केला घात

IND vs ENG : ऐतिहासिक लॉर्ड्सवर रोहितचं शतक हुकलं, अँडरसनच्या अप्रतिम बॉलनं केला घात

विदेशातील पहिलं टेस्ट शतक ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झळकावण्याची रोहित शर्माची चांगली संधी हुकली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test Lords) रोहित 83 रन काढून आऊट झाला.

पुढे वाचा ...
    लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : विदेशातील पहिलं टेस्ट शतक ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झळकावण्याची रोहित शर्माची चांगली संधी हुकली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test Lords) रोहित 83 रन काढून आऊट झाला. संपूर्ण आत्मविश्वानं बॅटींग करणारा रोहित शतक झळकावणार असं वाटत असतानाच अँडरसनच्या आतमध्ये येणाऱ्या अप्रतिम बॉलवर रोहित शर्मा बोल्ड झाला. लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या दिग्गजांना लॉर्ड्सवर आजवर शतक झळकावता आले नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) लॉर्ड्सवरील रेकॉर्ड निराशाजनक आहे. रोहितनं मात्र लॉर्ड्सवरील पहिल्याच इनिंगमध्ये आत्मविश्वासनं खेळ केला. विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, अजित आगरकर, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या भारतीयांच्या यादीत रोहित जागा मिळवणार असाच अंदाज होता. पण त्याला आता किमान दुसऱ्या इनिंगपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. रोहित-राहुलची भक्कम सुरुवात इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल (Rohit Sharma and KL Rahul) या जोडीनं सावध सुरुवात केली. जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन या इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सचा त्यांनी शांतपणे सामना केला. टीम इंडियानं पहिला फोर 13 व्या ओव्हरमध्ये लगावला. IND vs ENG : विराटला आजवर कधी जमलं नाही ते रोहित शर्मानं पहिल्या इनिंगमध्ये करून दाखवलं मैदानात सेट झाल्यानंतर रोहितनं खराब बॉलचा समाचार घेत रन जमवले. सॅम करनला त्यानं विशेष लक्ष्य केले. त्याच्या 10 बॉलमध्येच रोहितनं 5 फोर लगावले. रोहितनं त्याचं अर्धशतक 83 बॉलमध्ये पूर्ण केले. त्यानंतरही रोहितचा ओघ सुरु होता. त्यानं राहुलच्या मदतीनं पहिल्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली. नॉटिंघम टेस्टमध्ये या जोडीनं 97 रनची भागिदारी केली होती. या जोडीनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 126 रनची पार्टनरशिप करत टीम इंडियाला भक्कम सुरुवात करुन दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या