Home /News /sport /

IND vs ENG 5th Test : भारत-इंग्लंड टेस्ट लवकर सुरू होणार, हे आहे कारण

IND vs ENG 5th Test : भारत-इंग्लंड टेस्ट लवकर सुरू होणार, हे आहे कारण

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 1 जुलैपासून बर्मिंघममध्ये पाचवी टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या टेस्ट मॅचबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई, 26 जून : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 1 जुलैपासून बर्मिंघममध्ये पाचवी टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या टेस्ट मॅचबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सामना आता अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. भारतीय दर्शकांची संख्या बघता इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधल्या स्थानिक वेळेनुसार ही मॅच सकाळी 11 वाजता सुरू होणार होती, पण आता हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार पाचवी टेस्ट भारतीय वेळेनुसार दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत खेळवली जाईल. टेस्टमध्ये प्रत्येक टीमला दिवसाला 90 ओव्हर टाकाव्या लागतात, पण हा कोटा पूर्ण करणं जमत नाही, त्यामुळे अर्धा तास जास्त दिला जातो. असं झालं तर मॅच रात्री 10.30 पर्यंत चालेल. पहिली बॉलिंग करणाऱ्यांना फायदा इंग्लंड सध्या न्यूझीलंडविरुद्ध तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजमधल्या सामन्यांना सकाळी 11 वाजता सुरूवात होते. पण आता भारत-इंग्लंड यांच्यातली मॅच अर्धा तास लवकर सुरू झाली तर पहिले बॉलिंग करणाऱ्या टीमला याचा फायदा होऊ शकतो, कारण सकाळी हवा थंड असताना बॉल जास्त स्विंग होतो. भारत 2-1 ने आघाडीवर भारत आणि इंग्लंड यांच्यात मागच्या वर्षी ही टेस्ट सीरिज झाली होती, पण कोरोना व्हायरसमुळे पाचवी टेस्ट झाली नव्हती. ही टेस्ट आता खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मागच्या दौऱ्यात विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता, तर रवी शास्त्री कोच होते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल आणि राहुल द्रविड प्रशिक्षक असतील. दुसरीकडे इंग्लंडच्या टीममध्येही असेच बदल झाले आहेत. मागच्यावर्षी जो रूट इंग्लंडचा कर्णधार होता, पण ऍशेसमधल्या खराब कामगिरीनंतर रूटने राजीनामा दिला, यानंतर बेन स्टोक्सला कर्णधार करण्यात आलं. तर ब्रॅण्डन मॅकल्लम इंग्लंडचा कोच आहे. इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट आधी टीम इंडियाला धक्का बसला आहे, कारण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे तो या टेस्टमध्ये खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या