लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) लॉर्ड्स टेस्ट सुरु होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला. इंग्लंडचा अनुभवी बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Sturt Broad) दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून आऊट झाला आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यानंतर या सीरिजमधून आऊट झालेला ब्रॉड हा तिसरा प्रमुख खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 524 विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडवर इंग्लंडची मोठी भिस्त होती. तो आता आऊट झाल्यानं यजमान टीमच्या तयारीला धक्का बसला आहे. ब्रॉडला देखील त्याची निराशा यावेळी लपवता आली नाही.
स्टुअर्ट ब्रॉडनं इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहून त्याची निराशा व्यक्त केली आहे. 'परिस्थिती अत्यंत वेगानं बदलली आहे. ट्रेनिंगच्यापूर्वी आणि वॉर्मअप मॅचच्या दरम्यान मी खूप आनंदी होतो. मी एका अडथळ्यावरुन उडी मारली. त्यावेळी माझ्या उजव्या पायाची टाच दुखावली. मला कुणीतरी जोरात मारलं असं क्षणभर वाटलं. मी जेम्स अँडरसनला तसा प्रश्नही विचारला. पण माझ्या जवळपास कुणीही नव्हतं. त्यावेळी संकटात असल्याची मला जाणीव झाली.
मला स्कॅननंतर दुखापतीची माहिती कळाली. भारताविरुद्धच्या सीरिजमधून आऊट झाल्यानं मी निराश आहे. पण आता माझे लक्ष्य ऑस्ट्रेलिया आहे. मी पूर्ण वेळ घेणार आहे. कोणतीही गडबड करणार नाही. सावकाश पुढे जाणार आहे. ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी पूर्ण फिट होण्याचा माझा प्रयत्न आहे. आता माझं सारं लक्ष याच गोष्टीवर आहे.' असे ब्रॉडने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
View this post on Instagram
IND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली? विराटनं सांगितलं कारण
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नॉटिंघमध्ये झालेल्या टेस्टमध्ये ब्रॉडला फक्त 1 विकेट मिळाली. लॉर्ड्स टेस्टमध्ये ब्रॉडच्या जागी मार्क वूडचा समावेश करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england