मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडिया 'ऑन टॉप', इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात

IND vs ENG : टीम इंडिया 'ऑन टॉप', इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात

नॉटींगहम टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England 1st Test) टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात आली आहे.

नॉटींगहम टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England 1st Test) टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात आली आहे.

नॉटींगहम टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England 1st Test) टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नॉटिंगहम,  4 जुलै : नॉटींगहम टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England 1st Test) टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग झटपट संपुष्टात आली आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराहच्या  (Jaspreet Bumrah) भेदक स्पेलनं इंग्लंडला सातत्यानं धक्के बसले. त्यानंतर पालघर एक्स्प्रेस शार्दूल ठाकूरनं (Shardul Thakur) एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. भारतीय फास्ट बॉलर्सच्या जोरदार कामगिरीमुळे इंग्लंडची पहिली इनिंग 183  रनवर संपुष्टात आली.

नॉटींगहम टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. रॉय बर्न्सला शून्यावरच बुमराहनं आऊट केलं. त्यानंतर झॅक क्राऊली देखील मोठा स्कोअर करु शकला नाही. त्याला सिराजनं 27 रनवर आऊट केले. त्यामुळे लंचपूर्वी इंग्लंडचा स्कोअर 2 आऊट 61 होता.

लंचनंतर मोहम्मद शमीनं इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने डॉम सिबलेला आऊट केलं. सिबले आऊट झाल्यानंतर कॅप्टन जो रुटनं (Joe Root) जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) मदतीनं इंग्लंडची इनिंग सावरली. रुटनं त्याचं अर्धशतक 89 बॉलमध्ये पूर्ण केल. तब्बल 12 इनिंगनंतर रुटला अर्धशतक झळकावण्यात यश आलं. रुटचं अर्धशतक पूर्ण होताच टीम इंडियानं इंग्लडला चौथा धक्का दिला. मोहम्मद शमीनं बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यामुळे टी टाईमच्या वेळी इंग्लंडचा स्कोअर 4 आऊट 138 होता.टी टाईमनंतर भारतीय बॉलर्सनी इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं. मोहम्मद शमीनं डॅन लॉरेन्सला शून्यावर आऊट केलं. त्यानंतर बुमराहनं धोकादायक जोस बटलरलाही शून्यावर आऊट केलं.

IND vs ENG : नॉटिंघम टेस्टमध्ये मोठा ड्रामा, आधी नॉट आऊट नंतर OUT

या धक्क्यातून इंग्लंड सावरण्यापूर्वी शार्दूल ठाकूरनं एक बाजू लावून खेळणाऱ्या जो रूटला (Joe Root) आऊट करत इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला. रुटनं 64 रन केले. शार्दूलनं त्याच ओव्हरमध्ये ओली रॉबिन्सनला आऊट करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.

रॉबिन्ससन नंतर मैदानात आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडला बुमराहनं आऊट केलं. त्यानंतर  ब्रॉड आऊट झाल्यानंतर सॅम करननं शेवटी केलेल्या झुंजार खेळीमुळे इंग्लंडला 183 पर्यंत मजल मारता आली. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने चार विकेट्स घेतल्या. शमीनं 3, शादूर्लनं 2 तर सिराजनं 1 विकेट्स घेत इंग्लंडला झटपट गुंडाळण्यात त्यांची भूमिका बजावली.

First published:

Tags: Cricket, India vs england