मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG, 1st T20 : कधी सुरू होणार मॅच, LIVE Streaming कुठे?

IND vs ENG, 1st T20 : कधी सुरू होणार मॅच, LIVE Streaming कुठे?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिजला आजपासून सुरूवात होत आहे. या सीरिजच्या पाचही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिजला आजपासून सुरूवात होत आहे. या सीरिजच्या पाचही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिजला आजपासून सुरूवात होत आहे. या सीरिजच्या पाचही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.

  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 12 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिजला आजपासून सुरूवात होत आहे. या सीरिजच्या पाचही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जातील. टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा सहज पराभव केलेल्या टीम इंडियाला टी-20 सीरिज मात्र तेवढी सोपी जाणार नाही. अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच टी-20 मॅच होत आहे. ही खेळपट्टी बॅट्समनना मदत करणारी असेल, असं बोललं जातंय. दोन्ही टीमसाठी ही सीरिज म्हणजे टी-20 वर्ल्ड कपची रंगीत तालिम असेल. याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

इंग्लंडच्या टीमने मे 2019 पासून कोणतीही टी-20 सीरिज गमावलेली नाही. परदेशातही इंग्लंडने उत्कृष्ठ कामगिरी केली. त्यांनी श्रीलंका, न्यूझीलंड आणि दोनवेळा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. तर दुसरीकडे कोरोनानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडिची कामगिरीही दिमाखदार राहिली आहे.

किती वाजता सुरू होणार मॅच?

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टी-20 मॅच 12 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. भारतीय वेळेनुसार ही मॅच संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

भारत-इंग्लंड आमने-सामने

एकूण मॅच- 14

भारताचा विजय- 7

इंग्लंडचा विजय- 7

कशी असणार खेळपट्टी?

या मैदानामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मॅच खेळवल्या गेल्या, तेव्हा फास्ट बॉलरऐवजी स्पिनरना मदत झाली. जानेवारी महिन्यात झालेल्या या स्पर्धेत स्पिनरविरुद्ध रन करणं बॅट्समनना कठीण गेलं. यादरम्यान स्पिनर्सचा इकोनॉमी रेट 6.67 तर फास्ट बॉलरचा इकोनॉमी रेट 7.55 एवढा होता. भारताकडे युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांच्यासारखे स्पिनर्स आहेत.

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि इंग्लंडमधली पहिली टी-20 मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?

या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीव्ही आणि एयरटेल टीव्हीवर पाहता येईल.

भारताची संभाव्य टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार

इंग्लंडची संभाव्य टीम

जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, डेव्हिड मलान, ऑयन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करेन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, राशिद अली

First published:

Tags: India vs england, T20 cricket, Virat kohli