डरहम, 21 जुलै : इंग्लंडच्या टीममध्ये निवड व्हायच्या 4 तासांनंतर लगेच ओपनर हसीब हमीद (Haseeb Hameed) याने धमाकेदार शतक केलं आहे. बुधवारी इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या (India vs England) पहिल्या दोन टेस्टसाठी 17 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात हसीब हमीद याने शतक केलं. भारत-इंग्लंड यांच्यातल्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
228 बॉलमध्ये हसीब हमीदने आपलं शतक पूर्ण केलं, यात 12 फोरचा समावेश आहे. भारताकडून या सामन्यात बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर या बॉलरनी बॉलिंग केली, त्यामुळे हमीदच्या शतकाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.
What an innings, it's a CENTURY for @HaseebHameed97! @TrentBridge | @englandcricket Live stream ➡️ https://t.co/PTmNHbfGuZ#CountyXIvIndia pic.twitter.com/79HmHmrcln
— Durham Cricket (@DurhamCricket) July 21, 2021
हसीब हमीद याने 3 टेस्ट मॅचमध्ये 44 च्या सरासरीने 219 रन केले आहेत, यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे, 82 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
24 वर्षांच्या हसीब हमीदने या सामन्याआधी 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 33 च्या सरासरीने 3,821 रन केले, यात त्याने 7 शतकं आणि 22 अर्धशतकं केली. सराव सामन्यात केलेलं त्याचं हे 8 वं शतक आहे. हमीदने लिस्ट एमध्ये 19 सामने खेळून 4 अर्धशतकांसह 556 रन केले.
भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक
पहिली टेस्ट : ट्रेन्ट ब्रिज, 4 ऑगस्टपासून
दुसरी टेस्ट : लॉर्ड्स, 12 ऑगस्टपासून
तिसरी टेस्ट : हेडिंग्ली, 25 ऑगस्टपासून
चौथी टेस्ट : ओवल, 2 सप्टेंबरपासून
पाचवी टेस्ट : ओल्ड ट्रॅफर्ड, 10 सप्टेंबरपासून
इंग्लंडची टीम
जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्रॉले, सॅम करेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिनसन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स, मार्क वूड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england