नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आपण याआधी अनेक वेळा कर्मचाऱ्यांचा, बॅंकेचा संप झाल्याचे ऐकले असेल. मात्र आता पहिल्यांदाच क्रिकेटपटू संपावर जाणार आहेत. हा संघ आहे, बांगलादेशचा क्रिकेट संघ. नोव्हेंबरमध्ये भारत-बांगलादेश यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी बांगलादेशच्या संघाचीही घोषणा करण्यात आली होती. मात्र पगार वाढ झाली नाही म्हणून बांगलादेशचा संपूर्ण संघ संपावर गेला आहे. याचा परिणार भारत-बांगलादेश सामन्यावर होणार आहे.
सोमवारी बांगलादेश संघाच्या सर्व खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघानं बोर्डासमोर पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भारतात होणाऱ्या मालिकेवर संकट असणार आहे.
The 11-point charter of demands include an increase in match fee for first-class cricket, allowing them to play for franchise team when they are free from the domestic league and giving priority to local players and coaches among others.
— All India Radio News (@airnewsalerts) October 21, 2019
Details: https://t.co/jIY4W4c51i
सर्व खेळाडूंनी सामने खेळण्यास दिला नकार
सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.
गांगुलीनं दिली या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया
दरम्यान, क्रिकेट विश्वात या प्रकणावरून खळबळ माजली असताना बीसीसीआयचे नवे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आपले मत व्यक्त केले आहे. गांगुलीच्या मते, “बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपले अंतर्गत मदभेद दूर करतील. याचा भारतात होणाऱ्या मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही”. तसेच, भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा 24 नोव्हेंबरला होणार आहे.
अशी आहे मालिका
पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)
दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)
तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)
असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.
टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रदर्शन
बांगलादेशचे टी-20 प्रदर्शन विशेष चांगले राहिलेले नाही. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच याआधी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिक संघानं त्यांना नमवलं होते. त्यामुळं ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं बांगलादेशसाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.