BCCIचं चाहत्यांना मोठं दिवाळी गिफ्ट! मैदानात सामना पाहण्यासाठी भन्नाट ऑफर

BCCIचं चाहत्यांना मोठं दिवाळी गिफ्ट! मैदानात सामना पाहण्यासाठी भन्नाट ऑफर

आता स्वस्तात पाहू शकता लाईव्ह सामने, बीसीसीआयची खास भेट.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप दिल्यानंतर 240 गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर आता भारतीय संघ 2 नोव्हेंबरपासून बांगलादेश विरोधात कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान याआधी बीसीसीआयच्या वतीनं चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

बांगलादेश विरोधात घरच्या मैदानात होणाऱ्या मालिकेत चाहत्यांना फक्त 50 रुपयांमध्ये सामने पाहायला मिळणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात 22 ते 26 नोव्हेंबरमध्ये इडन गार्डन येथे पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी केवळ 200, 150, 100 आणि 50 अशा किमतीच्या तिकीट ठेवण्यात आल्या आहेत. सीएबीचे सेक्रेटरी अभिषेक डालमिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं लाईव्ह सामने पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यात 3 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. टी-20 मालिकेची सुरुवात 3 नोव्हेंबरपासून होणार आहे.

वाचा-बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ

24 तारखेला होणार टीम इंडियाची घोषणा

टी-20 आणि कसोटी सामन्यांसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा 24 ऑक्टोबरला केली जाणार आहे. या मालिकेत तीन टी-20 सामने आधी खेळले जाणार आहेत, त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. भारतीय निवड समिती मुंबईत 24 ऑक्टोबरला याबाबत घोषणा करणार आहे. यावेळी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे की नाही, तसेच धोनी खेळणार आहे का?, या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना मिळतील.

वाचा-‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान!

बांगलादेशचा संघ येणार नाही भारत दौऱ्यावर?

सोमवारी बांगलादेश संघाच्या सर्व खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघानं बोर्डासमोर पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भारतात होणाऱ्या मालिकेवर संकट असणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.

अशी आहे टी- मालिका

पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)

दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)

तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)

वाचा-हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2019, 7:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading