...आणि विराटनं मैदानात केली चीटिंग, VIDEO झाला VIRAL

...आणि विराटनं मैदानात केली चीटिंग, VIDEO झाला VIRAL

प्रेक्षक विराटला चीयर करत होते. त्यावेळी मोहम्मद शमी बॉलिंग करत होता. त्यावेळी विराट प्रेक्षकांकडे पाहून काही इशारे करत होता.

  • Share this:

इंदूर, 14 नोव्हेंबर: बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत आहे. सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी बांगलादेशचा डाव 150 धावात संपुष्टात आला. त्यानंतर दिवस अखेर भारताने एक बाद 86 धावा केल्या. भारत अद्याप 64 धावांनी पिछाडीवर आहे. याच सामनादरम्यानचा विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यात विराट प्रेक्षकांना काही इशारे करत असल्याचं दिसतंय.

मुंबईकर खेळाडू आता होणार दिल्लीकर! 9 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

प्रेक्षक विराटला चीयर करत होते. त्यावेळी मोहम्मद शमी बॉलिंग करत होता. त्यावेळी विराट प्रेक्षकांकडे पाहून काही इशारे करत होता. मला काय चीयर करता तुम्ही शमीला चीयर करा असं त्याला प्रेक्षकांना सांगायचं होतं. प्रेक्षक जेव्हा मोहम्मद शमीला चीयर करत होते त्याचवेळी महदी हसनच्या बॉलवर तो आउट झाला. आता विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते विराटला उगाच चीटिंग करू नकोस असं सांगत आहेत.

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे.

तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

First published: November 14, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading