India vs Bangladesh : 50 मिनिटांत खेळ संपला...ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताचा विजय

India vs Bangladesh : 50 मिनिटांत खेळ संपला...ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताचा विजय

India vs Bangladesh day Night test मध्ये भारतीय संघाचा दणदणीत विजय.

  • Share this:

कोलकाता, 24 नोव्हेंबर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतानं एक डाव 46 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांवर संपुष्टात आणला. भारतानं 2-0 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे.

तिसऱ्या दिवशी अवघ्या 50 मिनिटांत भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडले आणि पिंक कसोटीमध्ये दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दिवशी सामन्यावर अधिराज्य गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिला 50 मिनिटांत भारतानं हा सामना खिशात घातला. पहिल्या दिवशी इशांत शर्मानं पाच विकेट घेतल्या होत्या. तर, आज इशांत शर्मानं 4 तर उमेश यादवनं 5 विकेट घेतल्या.

बांग्लादेशचा दुसरा डाव अवघ्या 50 मिनिटांमध्ये आटपत भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशच्या खेळाडूंना माघारी धाडले. उमेश यादवनं 5 तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या.

पहिल्या दिवशी गोलंदाजांनी अधिराज्य गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विराट कोहलीनं विक्रमी कामगिरी केली. भारतानं दुसऱ्या दिवशी 347 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी बांगलादेशला 6 विकेट गमावत 152 धावा करता आल्या. त्यामुळं भारताकडे 89 धावांची आघाडी आधीच होती.

दुसऱ्या दिवशीही या सामन्यावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवले. सुरुवातीला विराट कोहलीनं फलंदाजीनं कमाल केल्यानंतर गोलंदाजांनीही आपले काम चोख पार केले. दुसऱ्या दिवशी इशांत शर्मानं 4 तर उमेश यादवनं 2 विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी लिंटन दास रिटार्यड हर्ट झाल्यानंतर आज मोहम्मदुल्लाह जखमी होऊन माघारी परतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या