Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध ‘या’ विकेटकिपरला मिळू शकते टीम इंडियात जागा, पंतचे करिअर संपुष्टात?

Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध ‘या’ विकेटकिपरला मिळू शकते टीम इंडियात जागा, पंतचे करिअर संपुष्टात?

बांगलादेशविरोधात नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी 24 ऑक्टोबरला निवड होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : बांगलादेशविरोधात नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी 24 ऑक्टोबरला निवड होणार आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती मुंबईत एक बैठक घेत कोणत्या खेळाडूंना जागा देणार याचा निर्णय घेणार आहे.

दरम्यान, या मालिकेत युवा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला जागा मिळू शकते. विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळकडून खेळणाऱ्या संजूनं तुफानी खेळी करत 129 चेंडूत द्विशतकी खेळी केली. त्यामुळं संजूची टीम इंडियात निवड केली जाऊ शकते. याचबरोबर शिवम दुबेच्याही नावाची चर्चा आहे. बांगलादेशविरोधात जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी संधी दिली जाऊ शकते. कारण ही मालिका भारतासाठी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे.

सॅमसननं केली होती द्विशतकी कामगिरी

विजय हजारे करंडक स्पर्धेत सॅमसननं दुहेरी शतक लगावले होते. त्यामुळं फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतच्या जागी सॅमसनला संघात जागा मिळू शकते. 24 वर्षीय संजूनं 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकार लगावत 212 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं चक्क 164.34च्या स्ट्राईक रेटनं ही वादळी खेळी केली. संजूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधले पहिले द्विशतक आहे. सॅमसन बरोबर शिवम दुबे आणि इशान किशन यांच्या नावाचीही चर्चा आहे.

रोहित शर्माला मिळणार टी-20चे कर्णधारपद

निवड समितीच्या वतीनं विराट कोहलीला बांगलादेश विरोधातल्या दौऱ्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळं बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्माला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

धोनीला मिळणार का संधी?

यावेळी संघाची निवड करताना सगळ्यांचे लक्ष असणार आहे ते महेंद्रसिंग धोनीवर. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात धोनीला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळं बांगलादेश विरोधात विराटला विश्रांती देत धोनीला संघात स्थान मिळू शकते.

बांगलादेशचा संघ येणार नाही भारत दौऱ्यावर?

सोमवारी बांगलादेश संघाच्या सर्व खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघानं बोर्डासमोर पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भारतात होणाऱ्या मालिकेवर संकट असणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.

असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, क्रुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 07:56 PM IST

ताज्या बातम्या