India vs Bangladesh : भारताला मिळाला टी-20चा नवा कर्णधार! संघानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी

India vs Bangladesh : भारताला मिळाला टी-20चा नवा कर्णधार! संघानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी

बांगलादेश विरोधात होणाऱ्या तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेसाठी आज मुंबईत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : बांगलादेश विरोधात होणाऱ्या तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेसाठी आज मुंबईत भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मुख्य म्हणजे टी-20 मालिकेत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर, महेंद्रसिंग धोनीच्या नावाचाही यात समावेश नाही आहे. धोनीनं वर्ल्ड कप 2019मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळं धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.

याचबरोबर विजय हजारे करंडकमध्ये द्विशतकी कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. 24 वर्षीय संजूनं 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकार लगावत 212 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं चक्क 164.34च्या स्ट्राईक रेटनं ही वादळी खेळी केली. संजूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधले पहिले द्विशतक आहे. त्याचबरोबर 15 खेळाडूंच्या संघात विजय हजारेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

कसोटी संघात विशेष बदल नाही

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारत बांगलादेश विरोधात कसोटी मालिका खेळणार आहे. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 260 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं कसोटीमध्ये भारतीय संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे.

अशी आहे टी- मालिका

पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)

दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)

तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)

बांगलादेशचा संघ येणार नाही भारत दौऱ्यावर?

सोमवारी बांगलादेश संघाच्या सर्व खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघानं बोर्डासमोर पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भारतात होणाऱ्या मालिकेवर संकट असणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.

असा आहे भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर.

असा आहे भारताचा कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋध्दीमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील, ऋषभ पंत.

First published: October 24, 2019, 5:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading