अॅडलेड, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात बुधवारी भारत आणि बांगलादेश संघात महत्वाचा मुकाबला होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण पाऊस झाला नाही तर अॅडलेडमध्ये एक चुरशीचा सामना होऊ शकतो. कारण आपल्याला आठवत असेल की टी20 वर्ल्ड कपमध्ये सहा वर्षांपूर्वी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. बंगळुरुतल्या त्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीच्या कुशल नेतृत्वामुळे टीम इंडियानं जवळपास हरलेला सामना आपल्या नावावर केला होता. दरम्यान दोन्ही संघातील बरेच खेळाडू अॅडलेडच्या सामन्यात खेळणार नाहीत. पण सामन्यात रंगत मात्र असेल हे नक्की.
2016 साली काय घडलं होतं?
बंगळुरुत टी20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील सामना भारत आणि बांगलादेश संघात रंगला होता. त्या मॅचमध्ये भारतानं बांगलादेशसमोर 147 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पण बांगलादेशी फलंदाजांनी टीम इंडियाला जोरदार टक्कर दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला जिंकण्यासाठी 11 धावा हव्या होत्या. त्यात मुशफिकुर रहिमनं दोन लागोपाठ दोन फोर मारुन 3 बॉलमध्ये दोन धावा असं समीकरण तयार केलं होतं.
हेही वाचा - T20 World Cup: रोहित-विराटसाठी हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप? पाहा BCCI सिलेक्टर काय म्हणाले...
धोनीनं विजय खेचून आणला
पण पुढच्या तीन बॉलवर बांगलादेशला एकही रन काढता आला नाही. या तिन्ही बॉलवर बांगलादेशचे तीन बॅट्समन आऊट झाले. हार्दिक पंड्याच्या त्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर रहिम आऊट झाला. तर पाचव्या बॉलवर अनुभवी मेहमुदुल्ला माघारी परतला. त्यामुळे एका बॉलमध्ये दोन धावा असं समीकरण झालं. शेवटच्या त्या बॉलवर धोनीनं हार्दिकला सांगून एक डावपेच आखला. हार्दिकनं ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाकला. बॅट्समन मिस झाला पण एक धाव घेताना धोनीनं चपळपणे रन आऊटही केलं आणि हा रोमहर्षक सामना भारतानं आपल्या नावावर केला.
Who remembers this 🔥 run-out from MS Dhoni in the 2016 @T20WorldCup? Where would you rate this in the top Dhoni moments in international cricket? pic.twitter.com/orpkEN3xhP
— ICC (@ICC) August 15, 2020
हेही वाचा -
पुन्हा बांगलादेशशी गाठ
वर्ल्ड कपच्या मैदानात हेच दोन प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कपमध्ये सहा वर्षांनी आमनेसामने येत आहे. 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध गटात असल्यानं या दोन्ही संघात लढत झाली नाही. दरम्यान टीम इंडियानं हा सामना जिंकल्यास पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर जाईल. सध्या या दोन्ही टीमच्या खात्यात 4-4 पॉईंट जमा आहेत.
भारत वि. बांगलादेश,
सुपर 12, ग्रुप 2 मॅच
अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket, T20 world cup 2022