दिल्ली प्रदूषणानंतर टीम इंडियावर ‘महा’ चिंता! भारताला गमवावी लागेल मालिका

दिल्ली प्रदूषणानंतर टीम इंडियावर ‘महा’ चिंता! भारताला गमवावी लागेल मालिका

टीम इंडियाची चिंता वाढली. दुसरा टी-20 सामना होणार रद्द.

  • Share this:

राजकोट, 04 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात सध्या तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता दुसरा टी-20 सामना 7 नोव्हेंबरला राजकोट येथे होणार आहे. मात्र पहिला टी-20 सामन्यावर प्रदूषणाचे सावट होते, आता दुसऱ्या सामन्यावर ‘महा’ समस्या आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्यावर वादळी संकट आहे. भारत-बांगलादेश दौऱ्याला याआधीच संकटांनी घेरले आहे. याआधी बांगलादेशचे खेळाडू संपावर गेल्यामुळं मालिका अडचणीत आली होती. त्यानंतर दिल्ली प्रदूषणामुळं पहिला सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती. आता राजकोट येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर तर चक्क ‘महा’ वादळाचे संकट आहे. त्यामुळं राजकोटमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. जर सामन्यादरम्यान पाऊस आला तर सामना रद्द होऊ शकतो. असे झाल्यास भारताला मालिका गमवावी लागेल. कारण सध्या बांगलादेशचा संघ 1-0नं आघाडीवर आहे.

वाचा-'कार्तिकची ‘चित्त्याची चाल’!, कॅचचा VIDEO पाहून तुम्ही धोनीलाही विसराल

‘महा’ चक्रीवादळामुळं होऊ शकतो सामना रद्द

‘महा’ चक्रीवादळामुळं राजकोट येथे खेळवण्यात येणारा दुसरा टी-20 सामना संकटात आहे. अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालेलं महा हे वादळ हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकू शकतं. अरबी समुद्रातलं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं आलं तर त्याचे परिणाम संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जाणवू शकतील, असा अंदात भारतीय हवामान विभागाने IMD नोंदवला आहे. गुजरातला याचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रात आलेले हे वादळ बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर येणार आहे. 6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

वाचा-नव्या ‘विराट’ पर्वाला सुरुवात, युवा खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम

सामना नाही झाला तर भारताला गमवावी लागेल मालिका

भारतीय संघाला नवी दिल्लीमध्ये झालेला पहिला सामना 7 विकेटनं गमवावा लागला. त्यामुळं भारताला दुसऱ्या सामन्याकडून जास्त अपेक्षा आहे. त्यामुळं 7 नोव्हेंबरला खेळवल्या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. परिणामी भारताला मालिका गमवावी लागे. भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला नागपूर येथे होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास ही मालिका बरोबरीत सुटेल.

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

First published: November 4, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading