Elec-widget

भारताने टी20 आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट मालिका 3-0 ने जिंकली

भारताने टी20 आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट मालिका 3-0 ने जिंकली

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी20 सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 03 एप्रिल : भारत आणि बांग्लादेश यांच्यात 28 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत खेळण्यात आलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंचं अपंगत्व 60% ते 90% होतं.

डिसेब्लड स्पोर्टिंग सोसायटी आणि व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेतील पहिला सामना 28 मार्च 2019 ला खेळण्यात आला. यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून सौरभ मलिकने शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर बांगलादेशला 201 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश 143 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला.

स्पर्धेतील दुसरा सामना 29 मार्चला लायन्स स्पोर्टस कॉम्प्लेक्स सांताक्रूझ येथे झाला. भारताचा कर्णधार रमेश सरतापेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने बांगलादेशच्या संघाला 142 धावांत रोखले. भारताच्या परशुराम देसले, सौरभ मलिक, संतोष रंजागणे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताने 142 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करून दुसरा सामनाही जिंकला.

तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने निकुल प्रजापतीच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशसमोर 238 धावांचे आव्हान ठेवले. प्रजापतीने 72 चेंडूत 146 धावा केल्या. त्याला सौरभ मलिकने अर्धशतक करून साथ दिली. 238 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 186 धावा करता आल्या. भारताने हा सामना 52 धावांनी जिंकून मालिकाही 3-0 ने जिंकली.

भारत-बांगलादेश यांच्यातील मालिकेत मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाचा पुरस्कार सौरभ मलिकला देण्यात आला. क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार बांगलादेशच्या राजोन हौसेनला मिळाला.

Loading...

strong>VIDEO: वाचाळवीर नेत्याची जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत प्रियांका गांधींवर केली टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...