India vs Bangladesh : सौरव गांगुली 'त्या' निर्णयावर ठाम, खेळाडू मास्क घालून मैदानात!

भारत-बांगलादेश यांच्यात पहिला टी-20 सामना रविवार, 3 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 03:15 PM IST

India vs Bangladesh : सौरव गांगुली 'त्या' निर्णयावर ठाम, खेळाडू मास्क घालून मैदानात!

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : भारत-बांगलादेश यांच्यात पहिला टी-20 सामना रविवार, 3 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी मागणी पर्यावरण मित्रांनी केली होती. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदुषणामुळं हा सामना रद्द होणार की काय असे असताना हा सामना याच मैदानावर खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी पर्यावरण मित्रांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्रद्वारे दिल्लीमध्ये सामने न ठेवण्याची मागणी केली होती. मात्र सौरव गांगुलीनं नुकतीच याबाबत माहिती देत सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावरच होणार असल्याचे सांगितले. दरम्यान आज बांगलादेश संघानं तोंडावर मास्क बांधून सराव केला. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं बीसीसीआय खेळाडूंच्या जीवाशी खेळत तर नाही आहे ना?, असा सवाल पर्यावरण मित्र करत आहेत.

Loading...

वाचा-'टीम इंडियाचा सिलेक्टर देता होता अनुष्काला चहा', माजी क्रिकेटपटूचा आरोप

दिवाळीमुळे वाढले वायू प्रदुषण

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेल्यामुळं दिल्लीतील वायू गुणवत्ता खालावली आहे. वायू गुणवत्ता आकड्यांनुसार (Air Quality Index) दिल्लीतील हवा सध्या अशुध्द असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) यांनी सामना ठरलेल्या वेळेनुसार आणि दिल्लीमध्येच होणार असल्याचे सांगितले.

‘सामन्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत’

भारत-बांगलादेश सामन्याबाबत सौरव गांगुलीला विचारले असता त्यांनी, सामना दिल्लीतच होणार असे सांगितले. तर, डीडीसीएचे अधिकारी यांनी, “रविवारी तीन नोव्हेंबर रोजी होणारा सामना ठरल्याप्रमाणे होईल. यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. बीसीसीआयच्या वतीनं सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे सांगितले.

वाचा-क्रिकेटपटूचं मानसिक संतुलन बिघडलं, 'या' संघाला बसला मोठा धक्का

2017मध्ये बीसीसीआयवर ओढवली होती नामुष्की

3 नोव्हेंबर रोजी भारत-बांगलादेश यांच्यातील सामना सायंकाळी 7 वाजता होणार आहे. दरम्यान अरुण जेटली स्टेडियमपासून एक किमी दूर हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे. त्यामुळं खेळाडूंना सरावादरम्यान मास्कचा वापर करावा लागला. याआधी 2017मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेलाही मास्क लावून सामना खेळावा लागला होता.

तिकीट विक्री तेजीत

दरम्यान या सामन्याच्या तिकीट विक्रीमध्ये तेजी आली आहे. सोमवारी ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त विक्री झाली. सध्या सामन्याच्या 750 रुपयांच्या सर्व तिकीट विकल्या गेल्या आहेत. तर, एक हजार आणि 1250च्या तिकीटही तेजीमध्ये विक्री होत आहे.

वाचा-धक्कादायक! BCCIने पैसेच दिले नाहीत, भारतीय संघ अडकला परदेशात

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...