अॅडलेड, 02 नोव्हेंबर: भारत आणि बांगलादेश संघात टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात महत्वाची लढत आज होणार आहे. या लढतीसाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि सिडनीत नेदरलँडला हरवून भारतानं 4 पॉईंटची कमाई केली. पण गेल्या रविवारी पर्थमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. आजचा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास कन्फर्म होईल. दरम्यान अॅडलेडच्या मैदानात बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसननं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी रोहितनं संघात केवळ एक बदल केला आहे. त्यानं दीपक हुडाऐवजी अक्षर पटेलला पुन्हा टीममध्ये स्थान दिलं आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
🚨 Toss & Team Update from Adelaide 🚨
Bangladesh have elected to bowl against #TeamIndia. #T20WorldCup | #INDvBAN Follow the match ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ 1⃣ change to our Playing as @akshar2026 is named in the team 🔽 pic.twitter.com/eRhnlrJ1lf — BCCI (@BCCI) November 2, 2022
टीम इंडिया बांगलादेशवर भारी
टी20 वर्ल़्ड कपमध्ये आतापर्यंत टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये तीन सामने झाले आहेत. त्यात तिन्ही वेळा भारतानं बाजी मारली होती. 2016 साली उभय संघात शेवटचा सामना रंगला होता. त्यात धोनीच्या टीम इंडियानं अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या त्या सामन्यात बांगलादेशला एका धावेनं हरवलं होतं. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी या दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येत आहेत.
लोकेश राहुलकडून अपेक्षा
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुलनं निराशा केली आहे. पहिल्या तीन सामन्यात त्यानं अवघ्या 22 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध लोकेश राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. काल राहुलनं नेट्समध्ये बराच वेळ सराव केला होता. यावेळी विराट कोहलीनंही त्याला मार्गदर्शन करताना दिसला होता.
हेही वाचा - Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला पाहून पुजाऱ्याची खुलली कळी; नृसिंहवाडीतील सेल्फीचा लय भारी Video
पावसाचा व्यत्यय?
अॅडलेडमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून सामन्यादरम्यान थोड्याफार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण या सामन्यात पूर्ण 20-20 ओव्हर्सचा खेळ व्हावा अशी अपेक्षा आहे. कारण भारतीय संघासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Sports, T20 cricket, T20 world cup 2022