India vs Bangladesh : दिवाळीचा धूर टीम इंडियासाठी धोक्याचा, पहिला सामना रद्द होण्याच्या मार्गावर

India vs Bangladesh :  दिवाळीचा धूर टीम इंडियासाठी धोक्याचा, पहिला सामना रद्द होण्याच्या मार्गावर

भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला टी-20 सामना नवी दिल्ली येथे होणार आहे. मात्र पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.

नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणाऱ्या भारत-बांगलादेश टी-20 सामना सध्या अडचणीत आहे ते वायू प्रदुषणामुळं. दिवाळीनंतर राजधानीतील प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळं दुषित हवेत खेळाडू कसे खेळणार, असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. दिल्लीतील प्रदुषणामुळं हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.

टीम इंडियाला दिवाळी पडणार महागात

दिवाळीच्या आधी आणि नंतर एक्यआईच्या (air quality index) आकड्यांनुसार 0-50 खुप चांगली, 51-100 चांगली, 101-200 मध्यम, 201-300 खराब, 300-400 खुप खराब आणि 400च्या वर गंभीर अशी विभागणी करण्यात आली आहे. यानुसार दिल्लीमधली हवा सध्या 337 म्हणजेच खुप खराब आहे. त्यामुळं फटाके आणि प्रदुषण यांचा फटका भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्याला बसणार आहे.

वाचा-शाकिबच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी नवा खुलासा, समोर आलं IPL कनेक्शन

दोन्ही संघांच्या सरावावर परिणाम

भारत-बांगलादेश यांच्यातील सामना हा संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल त्यामुळं प्रदुषणाचा तसा फटका सामन्याला बसण्याची शक्यता कमी आहे. रात्रच्या वेळी प्रदुषणाची तीव्रता कमी असेल. दरम्यान असे असले तरी, खेळाडूंना सराव करता येईल का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. उद्यापासून भारत-बांगलादेश या दोन्ही संघांचा सराव वर्ग भरवला जाऊ शकतो.

वाचा-ICC चा दणका, भारत-बांगलादेश दौऱ्याआधी अष्टपैलू खेळाडूवर बंदीची कारवाई

बीसीसीआयनं काढला तोडगा

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “सामन्यावर विशेष परिणाम होणार नाही, कारण सामना सायंकाळी असेल. मात्र मुद्दा सरावाचा आहे. आजही हवेत विशेष सुधार न झाल्यामुळं खेळाडूंना सराव करता येत नाही आहे”, असे सांगितले. त्यामुळं गुरुवारी किंवा शुक्रवारी खेळाडूंना सरावासाठी विशेष सोय केली जाणार आहे. प्रदुषणामुळे खेळाडूंना मास्क बांधून सराव करावा लागू शकतो.

2007मध्ये श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये वापरावा लागला होता मास्क

2007मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात त्रास सहन करावा लागला होता. श्रीलंका संघानं हा सामना तोंडाला मास्क बांधून हा सामना खेळला. त्यामुळं हीच चूक पुन्हा होणार नाही यासाठी बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट बोर्ड चर्चा करणार आहे. त्यामुळं जर सामन्यादरम्यान प्रदुषण असेल तर बांगलादेशच्या संघालाही मास्क बांधून खेळावे लागेल.

वाचा-क्रिकेटविश्वाला मिळाल नवा सेहवाग; 36 चौकार, 5 षटकारांसह ठोकल्या नाबाद 261 धावा!

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या