India vs Bangladesh : दिल्लीतील टी-20वर टांगती तलवार कायम, सामना होणार की नाही 'ही' आहे डेडलाईन

India vs Bangladesh : दिल्लीतील टी-20वर टांगती तलवार कायम, सामना होणार की नाही 'ही' आहे डेडलाईन

भारत-बांगलादेश यांच्यात अरूण जेटली मैदानावर आज पहिला टी-20 सामना होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात अरूण जेटली मैदानावर आज पहिला टी-20 सामना होणार आहे. मात्र हा सामन्यावर प्रदूषणाचे सावट आहे, त्यामुळं बीसीसीआयची चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रविवारी दिल्लीतील हवा अधिक दुषित झाली आहे. दरम्यान आज सकाळी दिल्लीत पावसाच्या सरीही आल्या त्यामुळं सामना संकटात सापडला आहे. सामन्यावर पावसाचे नाही तर प्रदुषणाचे संकट आहे. दिल्लीत झालेल्या पावसाने प्रदुषण आणखी वाढलं आहे.

हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत रविवारी सकाळी पाऊस झाला. यामुळे प्रदुषणात वाढ झाली. पावसामुळे प्रदुषण कमी होतं पण त्यासाठी जोरदार पाऊस व्हायला हवा. दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानं प्रदुषणाची पातळी 625 वर पोहचली आहे. सरकारी संस्था सफरने सांगितल्यानुसार AQI सकाळी साडेसहा वाजता 410 होता. पाऊस पडून गेल्यानंतर 9 वाजता तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदूषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली.

वाचा-प्रदूषणाच्या वादात अडकलेल्या दिल्ली टी-20त घडणार इतिहास!

दिल्लीत वायू प्रदूषणाचे प्रसंग प्रचंड वाढले असले तरी, सामन होणार की नाही याचा निर्णय सामन्याआधीच घेतला जाणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार असून मॅच रॅफरी याआधी हवेची गुणवत्ता तपासून सामना होणार की नाही याचा निर्णय घेतील.

मैदानावर धुक्याचे सावट

रविवारी सकाळी अरूण जेटली स्टेडियम परिसरात झालेल्या पावसामुळं धुक्याचे (Delhi Air Pollution) प्रमाण वाढले आहे. पावसामुळं येथील हवा आणखी दुषित झाली आहे. सध्या दिल्लीत एवढे धुके आहे की मैदानात उघड्या डोळ्यांनी पाहणे कठिण झाले आहे. त्यामुळं सायंकाळी अशीच परिस्थिती असल्याच सामना रद्द होऊ शकतो.

वाचा-विराटनं नाकारलं पण रोहितनं घेतलं, खेळाडू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण

दिल्लीमध्ये आपतकालिन परिस्थिती

दिल्ली आणि एनसीआरमध्ये हवेची स्थिती प्रचंड वाईट आहे. ताज्या आकड्यांनुसार दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी 1000 अंकांवर पोहचली आहे. दरम्यान, ऊस पडून गेल्यानंतर 9 वाजता तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदुषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली. दिल्लीतील प्रदूषण एवढे जास्त आहे की इंदिरा गांधी विमातळावरून 32 विमानांची दिशा बदलण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 3, 2019, 3:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading