Elec-widget

India vs Bangladesh : इशांत शर्मानं 12 वर्षांनंतर मारला 'पंजा', ऐतिहासिक सामन्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी

India vs Bangladesh : इशांत शर्मानं 12 वर्षांनंतर मारला 'पंजा', ऐतिहासिक सामन्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी

भारताच्या पहिल्या ऐतिहासिक डे-नाइट सामन्यात भारतानं तुफानी कामगिरी केली आहे.

  • Share this:

कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारताच्या पहिल्या ऐतिहासिक डे-नाइट सामन्यात भारतानं तुफानी कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व राखले. त्यामुळं बांगलादेशच्या फलंदाजांना डोके वर काढता आले नाही. या ऐतिहासिक सामन्यात बांगलादेशच्या संघाला केवळ 106 धावा करता आल्या. यात इशांत शर्मानं अविश्वसनीय कामगिरी केली.

भारतीय गोलंदाजांच्या टॉप खेळीमुळे बांगलादेशच्या फलंदाजांचा गुडघे टेकावे लागले. भारताकडून इशांत शर्मानं ऐतिहासिक सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर, उमेश यादवनं 3 आणि शमीनं 2 विकेट घेतल्या. इशांत शर्मानं पाच विकेट घेण्याची कामगिरी पहिल्यात डे-नाईट सामन्यात करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भारताच्या पहिल्या डे-नाईट सामन्यात पाच विकेट घेत इशांत भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर इशांतने डे-नाईट कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय कसोटी सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

वाचा-साहाचा तुफानी कॅच! ऐतिहासिक कसोटीत केली 'शतकी' कामगिरी, VIDEO VIRAL

तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारतीय संघानं बाजी मारली. यात रोहित शर्मा आणि ऋध्दीमान साहा यांनी जबरदस्त झेल घेतल्या.

वाचा-शमीच्या घातक बाउंसरचा शिकार झाला लिटन दास, मैदानातच आली चक्कर

भारतासाठी डे-नाईटमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज

भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात डे-नाईट सामन्यात इशांत शर्मानं 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान भारताकडून पहिल्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी अनिल कुंबळेनं केली होती. तर, डे-नाईट टी-20 सामन्यांमध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी कुलदीप यादवनं केली होती. तर, आता डे-नाईट कसोटीमध्ये पहिल्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी इशांत शर्मानं केली आहे.

वाचा-हिटमॅन बनला सुपरमॅन! रोहितनं विराटकडून हिसकावला कॅच, पाहा VIDEO

10व्यांदा इशांत शर्मानं केली अशी कामगिरी

बांगलादेश विरोधात एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी इशांत शर्मानं तब्बल 10वेळा केली आहे. याचबरोबर त्यानं श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com