रोहित-पुजारानं मिळून घेतला सर्वात मजेशीर कॅच, VIDEO पाहून तुम्हीही हसाल

रोहित-पुजारानं मिळून घेतला सर्वात मजेशीर कॅच, VIDEO पाहून तुम्हीही हसाल

'अरे हे काय करताय?', रोहित-पुजाराचा मजेशीर VIDEO एकदा पाहाच.

  • Share this:

कोलकाता, 23 नोव्हेंबर : भारताच्या पहिल्या ऐतिहासिक डे-नाइट सामन्यात भारतानं तुफानी कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व राखले. त्यामुळं बांगलादेशच्या फलंदाजांना डोके वर काढता आले नाही. या ऐतिहासिक सामन्यात बांगलादेशच्या संघाला केवळ 106 धावा करता आल्या. यात इशांत शर्मानं अविश्वसनीय कामगिरी केली.

तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारतीय संघानं बाजी मारली.

भारतीय गोलंदाजांच्या टॉप खेळीमुळे बांगलादेशच्या फलंदाजांचा गुडघे टेकावे लागले. भारताकडून इशांत शर्मानं ऐतिहासिक सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर, उमेश यादवनं 3 आणि शमीनं 2 विकेट घेतल्या. यात रोहित शर्मा आणि ऋध्दीमान साहा यांनी जबरदस्त झेल घेतल्या. मात्र रोहित आणि पुजारा यांनी मिळून घेतलेला कॅच सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला. बांगलादेशची शेवटची विकेट अबु जायदेची होती. मोहम्मद शमीच्या चेंडूवर भारताला ही विकेट मिळाली. मजेशीर गोष्ट म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून हा मजेशीर कॅच घेतला.

वाचा-साहाचा तुफानी कॅच! ऐतिहासिक कसोटीत केली 'शतकी' कामगिरी, VIDEO VIRAL

वाचा-शमीच्या घातक बाउंसरचा शिकार झाला लिटन दास, मैदानातच आली चक्कर

मोहम्मद शमीच्या 31व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अबु जायेदच्या बॅटचा किनारा चेंडूला लागला. हा चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला. मात्र रोहित शर्माच्या हातून हा कॅच निसटला आणि चेंडू पुजाराच्या हातात गेला. त्यामुळं रोहित-पुजारानं मिळून हा कॅच पकडल्यानंतर गोलंदाज शमी आणि कर्णधार विराट कोहली हसू लागले.

वाचा-हिटमॅन बनला सुपरमॅन! रोहितनं विराटकडून हिसकावला कॅच, पाहा VIDEO

इशांत शर्मानं घेतल्या पाच विकेट

भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात डे-नाईट सामन्यात इशांत शर्मानं 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान भारताकडून पहिल्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी अनिल कुंबळेनं केली होती. तर, डे-नाईट टी-20 सामन्यांमध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी कुलदीप यादवनं केली होती. तर, आता डे-नाईट कसोटीमध्ये पहिल्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी इशांत शर्मानं केली आहे. बांगलादेश विरोधात एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी इशांत शर्मानं तब्बल 10वेळा केली आहे. याचबरोबर त्यानं श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 23, 2019, 7:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading