India vs Bangladesh : डे-नाईट कसोटीमध्ये कोणाचा दबदबा? सामन्याआधी जाणून घ्या Records

India vs Bangladesh : डे-नाईट कसोटीमध्ये कोणाचा दबदबा? सामन्याआधी जाणून घ्या Records

डे-नाईट कसोटीमधील काही विक्रमांवर नजर टाकूयात...

  • Share this:

कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये आज एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. कोलकाताच्या इडन गार्डन मैदानात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पदावर येताच पुढाकर घेत संमती दिली. आयसीसीनं सात वर्षांपूर्वी दिवस-रात्र सामन्यासाठी परवानगी दिली होती. आज भारत-बांगलादेश यांच्यात अखेर 12वा दिवस-रात्र सामना होणार आहे. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेटमधील या नव्या गुलाबी पर्वासाठी संपूर्ण कोलकाता शहर सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर डे-नाईट कसोटीमधील काही विक्रमांवर नजर टाकूयात...

ऑस्ट्रेलियाचा दबदबा...

डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया होय. ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक डे-नाईट सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांची कामगिरी देखील शानदार आहे. क्रिकेटमधील पहिला डे-नाईट कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने विजय मिळवला होता. डे-नाईटमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा देखील पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ वेस्ट इंडिने 3 डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. पण या तिन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला. इंग्लंडने डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी ऑगस्ट 2017मध्ये वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 209 धावांनी पराभव केला होता.

वाचा-India vs Bangladesh : ऐतिहासिक 'गुलाबी' पर्वाला सुरुवात! बांगलादेशनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

सर्वाधिक धावा...

पाकिस्तानचा अजहर अली याच्या नावावर डे-नाईट कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. अलीने 3 डे-नाईट सामन्यात 91.20च्या सरासरीने 456 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 3 अर्धशतकांसह 405 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 50.62 इतकी आहे.

एका डावात त्रिशतक...

अजहर अलीच्या नावावर एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने दुबई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 302 धावांची खेळी केली होती. ऑक्टोबर 2016मध्ये अलीने डे-नाईट कसोटीमधील पहिले त्रिशतक झळकावले होते. पाकिस्तानने या सामन्यात 56 धावांनी विजय मिळवला होता. याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध बर्मिंगम येथे ऑगस्ट 2017मध्ये 243 धावा केल्या होत्या.

वाचा-टीम इंडिया पदार्पणासाठी सज्ज, गुलाबी रंगात रंगलं इडन गार्डन; पाहा VIDEO

सर्वात यशस्वी गोलंदाज...

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने डे-नाईट कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. स्टार्कने 5 सामन्यात 26 विकेट घेतल्या असून 88 धावांवर 5 विकेट ही त्याची सर्वोत्त कामगिरी आहे. या कामगिरीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड 21 विकेटांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

एका डावात घेतल्या 8 विकेट...

डे-नाईट कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा फिरकीपटू देवेंद्र बीशू याच्या नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 49 धावा देत एका डावात 8 विकेट घेतल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंस याने 23 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या.

वाचा-वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर, मोहम्मद शामी करणार कमबॅक

150च्या आत ऑल आऊट...

डे-नाईट कसोटी सामन्यात आतापर्यंत झालेल्या डावातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे 11 वेळा संघ 150च्या आत ऑल आऊट झाला आहे.

जलद गोलंदाज आघाडीवर...

डे-नाईट कसोटीमध्ये आतापर्यंत जलद गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. 11 कसोटी सामन्यात जलद गोलंदाजांनी 25च्या सरासरीने 257 विकेट घेतल्या आहेत. तर फिरकिपटूंनी 31च्या सरासरीने 91 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या