साहाचा तुफानी कॅच! ऐतिहासिक कसोटीत केली 'शतकी' कामगिरी, VIDEO VIRAL

साहाचा तुफानी कॅच! ऐतिहासिक कसोटीत केली 'शतकी' कामगिरी, VIDEO VIRAL

भारत-बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये ऐतिहासिक सामना होत आहे.

  • Share this:

कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये ऐतिहासिक सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशनं लाजीरवाणी कामगिरी केली. संपूर्ण संघ केवळ 106 धावा करत बाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या टॉप खेळीमुळे बांगलादेशच्या फलंदाजांचा गुडघे टेकावे लागले. भारताकडून इशांत शर्मानं ऐतिहासिक सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर, उमेश यादवनं 3 आणि शमीनं 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारतीय संघानं बाजी मारली. गुलाबी चेंडूच्या जोरावर इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना कमबॅक करण्याची संधी दिली नाही. यात रोहित शर्मा आणि ऋध्दीमान साहा यांनी जबरदस्त झेल घेतल्या. याच बरोबर ऋद्धीमान साहाचा झेल सर्वात जास्त चर्चेत आला, कारण या झेलसह त्यानं शतकी कामगिरी केली आहे.

वाचा-शमीच्या घातक बाउंसरचा शिकार झाला लिटन दास, मैदानातच आली चक्कर

चहापानानंतर ऋद्धीमाननं धोनीच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. साहानं शादमान इस्लाम आणि महमुदूल्लाहला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये आपले शतक पूर्ण केले. दुखापतीनंतर टीम इंडियात कमबॅक करणारा साहानं कसोटी क्रिकेटमध्ये 100 फलंदाजांना बाद केले. सलामीचा फलंदाज शादनाम इस्लाम पहिल्या सत्रात बाद करत साहानं ही कामगिरी केली.

वाचा-हिटमॅन बनला सुपरमॅन! रोहितनं विराटकडून हिसकावला कॅच, पाहा VIDEO

36 सामन्यात साहानं केली कामगिरी

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. मैदानावर स्थिर झालेल्या इस्लामला उमेश यादवनं आपल्या जाळ्यात अडकवले. मात्र यात साहाच्या कामगिरीचे जास्त कौतुक आहे. साहानं निसटता कॅच पकडला. ही कॅच घेत साहानं आपली शतकी कामगिरी पूर्ण केली. कसोटीमध्ये 100 शिकार करणारा साहा हा पाचवा भारतीय फलंदाज आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी 294 फलंदाजांसह पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीनं 166 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. याशिवाय 151 डावांमध्ये 198 फलंदाजांना बाद करत सैयद किरमानी, 107सह नयन मोंगिया हे फलंदाज आहेत. साहानं ही कामगिरी 36 सामने आणि 69 डावांमध्ये केली. यात 89 कॅच आणि 11 स्टम्प केल्या आहेत.

वाचा-जीवघेणा चेंडू! स्वत:ला वाचवण्यासाठी मैदानातच बसला आंद्रे रसेल, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या